शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दिल्लीचा महाठग नाशकात आला जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 02:45 IST

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणूकदार, खरेदीदारांची २०१६ ते २०१८ सालामध्ये सुमारे १ हजार कोटींची फसवणूक करून फरार झालेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार पीयूष तिवारीला (४२) सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर उत्तर दिल्ली पोलिसांच्या ‘एएटीएस’च्या पथकाने नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देएक हजार कोटींना गंडा घालून होता फरार

नाशिक : दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणूकदार, खरेदीदारांची २०१६ ते २०१८ सालामध्ये सुमारे १ हजार कोटींची फसवणूक करून फरार झालेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार पीयूष तिवारीला (४२) सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर उत्तर दिल्ली पोलिसांच्या ‘एएटीएस’च्या पथकाने नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या. तिवारी हा नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून स्वत:ची ओळख, चेहरा बदलून एक मोठा कांदा व्यावसायिक पुनीत भारद्वाज नावाने वास्तव्यास होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. २०११ सालापासून बांधकाम व्यावसायिक म्हणून व्यवसायाला संशयित पुनीतने सुरुवात केली. २०१८ सालापर्यंत त्याने १५ ते २० लहान व ८ मोठ्या कंपन्या सुरू केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या मयूरविहार, आनंदविहारसह     िविध पोलीस ठाण्यांत, तसेच उत्तर प्रदेशच्या नोएडा, सूरजपूर, तसेच पंजाबच्या अमृतसर शहरासह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये मिळून ३७ फसवणुकीचे गुन्हे पीयूषवर दाखल आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीसदेखील जाहीर केले होते. हा महाठग मागील सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. उत्तर दिल्ली पोलिसांनी त्याचा माग काढत विविध राज्यांमधील शहरे पालथी घातली होती. अखेर खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकमध्ये उत्तर दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थेफ्ट युनिटचे (एएटीएस) पथक येऊन धडकले. पथकाने नाशिकमध्ये संशयित पीयूषची माहिती काढत सापळा रचला आणि शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या. नाशिकमध्येही भागीदारीस्वत:ला कांदा व्यावसायिक भासवत सराईत गुन्हेगार पीयूष तिवारी हा नाशिकमध्ये त्याचा ‘लूक’ बदलून वेशांतर करीत पुनीत भारद्वाज नावाने वास्तव्यास होता. त्याने नाशिकमधील एका नामांकित हॉटेल व्यावसायिक ग्रुपसोबत भागीदारी करीत ‘श्रीमंत’ होण्याचा नवा मार्गही शोधला होता, अशी माहिती उत्तर दिल्ली पोलिसांनी दिली. —इन्फो—‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यात १२० कोटींचे मिळाले होते घबाडपीयूष तिवारी याच्या घरावर २०१६ साली प्राप्तीकर विभागाने छापा टाकला होता. त्याने सरकारची फसवणूक करीत करचोरीचा संशय विभागाला होता. या कारवाईत त्याच्याकडे १२० कोटी रुपयांचे घबाड आढळून आले होते. प्राप्तीकर विभागाने ही रक्कम जप्त करीत सरकार दरबारी जमा केली होती. —-इन्फो—...म्हणून फसवणुकीचा नवीन ‘उद्योग’२०१६ साली प्राप्तीकर विभागाच्या झालेल्या कारवाईमुळे व्यवसाय डबघाईस आला. यामुळे पीयूष तिवारी याने स्वत:ला बिल्डर भासवून नवीन व्यवसाय करीत दिल्ली एनसीआरमध्ये फ्लॅट, प्लॉटस् विक्री करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली. एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करीत त्याने ‘माया’ जमविली होती. —इन्फो—वाणिज्य शाखेचा पदवीधरदिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी पीयूष तिवारी याने मिळविली आहे. तो मूळ उत्तर प्रदेशचा असून, तेथे  टॉवर-ए, ओमॅक्स फॉरेस्ट स्पा, सेक्टर-९३ बी, नोएडा या मोठ्या इमारतीत कुटुंबासह राहत होता. फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर पीयूषने आपला मुक्काम दक्षिण भारतात हलविला होता. यानंतर कांदा व्यावसायिक म्ह

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक