शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : महाजनांच्या गुगलीने भाजप आमदार धास्तावले; उमेदवारीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 04:19 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या आमदारांना उमेदवारी मिळेल काय हे गंगामय्येलाच माहिती, असे विधान केल्याने आमदारांची धाकधूक वाढली आहे.

नाशिक : नाशिक शहरातील भाजपाच्या विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत तगडी आव्हाने उभी राहत असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या आमदारांना उमेदवारी मिळेल काय हे गंगामय्येलाच माहिती, असे विधान केल्याने आमदारांची धाकधूक वाढली आहे. नाशिक शहरात चार पैकी तीन मतदारसंघांत भाजपाचे आमदार आहेत. विद्यमान आमदारांना साधारणत: पुन्हा संधी दिली जात असते. मात्र भाजपात अस्थिर वातावरण आहे. पक्षांतर्गत या उमेदवारांना मोठे आव्हान उभे झाले आहेत.प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या इतकी वाढली आहे की, आमदारांना ते अडचणीचे ठरत आहे. संंबंधित इच्छुकांनी केवळ इच्छाच व्यक्त केली असे नव्हे तर सर्वच जण प्रचाराच्या तयारीलादेखील लागले आहेत. त्यामुळे आमदारांना विरोधकांपेक्षा पक्षातील इच्छुकच अधिक डोईजड झाले आहेत, असे असताना उमेदवारी निवडीत निर्णायक मत असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मात्र केलेल्या विधानामुळे आमदार धास्तावले आहेत. गुरुवारी (दि.१९) गंगेच्या धर्तीवर गंगाआरती सुरू करण्याच्या सोहळ्याच्या वेळी त्यांनी विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार काय? या प्रश्नावर त्यांनी गंगा मय्येलाच माहीत, उमेदवारी मिळणार की नाही हे सांगण्यास मी पुरोहित नाही, असे सांगितल्याने त्याच ठिकाणी असलेले आमदार धास्तावले आहेत.काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी शहरातील आमदारांसंदर्भातील अशाच प्रकारच्या प्रश्नावर बोलताना जो निष्ठावान असेल, ज्याने पाच वर्षांत कोणता वाद घातला नसेल, खूप कामे केली असतील अशा प्रकारचे निकष बघूनच उमेदवारीचा निर्णय होईल, असे सांगितले होते. शहरातील प्रत्येक आमदाराचेच काही ना कारणावरून पक्षात वाद झाले आहेत.>शिवसेनेला धक्का : राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात अखेर युती झाली असली तरी नाशिक शहरातील जागांबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेतील इच्छुकांचा भ्रम निरास होण्याची शक्यता आहे. विद्यमान जागा भाजपकडेच राहतील असे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019