शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिनी उत्पादनांच्या जाहीरांतींविरोधात आक्रमक भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:40 IST

भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. 

ठळक मुद्देचिनी उत्पादनांविरोधात मनसेची आक्रमक भूमिका शहरातील चीन उत्पादनांच्या जाहीराती तत्काळ हटवा मनसेचे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन

नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर आदी नेत्यांच्या सुचनांप्रमाणे मनसेच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब याची भेट घेऊन नाशिक शहरातील चीनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्यात याव्यात यासाठी निवेदेन सादर केले. चीनी सैनिकांनी भारत-चीन नियंत्रण रेषेवरील लद्दाखच्या गोलवन खोºयातील भारतीय भूभागावर निशस्त्र भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केल्याने या हल्ल्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. चीनच्या या आगळीकीने देश व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोषाची भावना आहे. चीनच्या या मुजोर आगळीकीला आर्थिक निबंर्धाने प्रतिऊत्तर देण्याची मागणी जनतेच्या सर्व थरांतून होत आहे.  मात्र शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी व प्रमुख बाजारपेठांमधील व्यावसायिक आस्थापनांवर चीनी वस्तूंच्या जाहिराती व फलकांमुळे जनमानसात मोठ्या प्रमाणावर रोष असल्याचे नमूद करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील असे जाहिराती व फलक संबंधितांनी त्वरीत काढून घ्याव्यात अशी मागणी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनांच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे संबधितांनी असे जाहीराती व फलक काढले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चीनी उत्पादनांच्या जाहिराती व फलकांवर काळे फासण्याचे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिनिधी मंडळाने केली दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनपा आयुक्तांना  निवेदनावर देताना मनविसेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. 

टॅग्स :border disputeसीमा वादNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्तAdvertisingजाहिरात