शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मनपाकडून ३ लाखांचे बक्षीस जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:43 IST

सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली.

ठळक मुद्देसदगीर यांची नाशिक महापालिका ‘ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर’पदी निवड २८ तारखेला महाकवी कालिदास कलामंदिरात नागरी सत्कार

नाशिक : ‘केसरी’ किताब पटकाविणारा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांची नाशिक महापालिका ‘ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर’पदी निवड करण्यात आली आहे. तसेच मंगळवारी (दि.२१) पार पडलेल्या महासभेत सदगीर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मनपाच्या वतीने येत्या २८ तारखेला महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिककरांकडून नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मनपाने त्यांना  ३ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

हर्षवर्धन सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. पुणे येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत सदगीर यांनी लातूरच्या पहिलवानाचा पराभव करत महाराष्ट्र  केसरी होण्याचा बहुमान मिळविला. सदगीर यांना मनपाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करावी आणि त्यांचा अभिनंदनाचा ठरावास स्थायी समितीकडून यापुर्वीच मान्यता देण्यात आली होती. महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे.

दरम्यान, महासभेत अभिनंदनाचा ठराव पारित होत असताना सभागृहातील नगरसेवकांनी सदगीर यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्याच्या सूचनेबरोबरच ३ लाख रूपये रोख रक्कम, चांदीची गदा भेट देऊन आॅलिम्पिकसाठी सदगीर यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, यासारख्या सुचनाही मांडल्या. तसेच नागरिकांनाही मदतीचे आवाहन करावे आणि नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्याची सुचनाही यावेळी पुढे आली. महासभेने प्रस्तावास मंजुरी दिली.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती