शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र चेंबर उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 01:25 IST

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य विभागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी व उद्योग जगताचे लक्ष लागून असलेली उत्तर महाराष्ट्र विभागाची निवडणूकही अखेर आजी-माजी अध्यक्ष व विश्वस्तांच्या मध्यस्थीमुळे बिनविरोध झाली आहे.

ठळक मुद्देविश्वस्त मंडळाच्या प्रयत्नांना यश : परस्पर विरोधी गटात उपाध्यक्ष, चेअरमनपदाच्या वाटपातून समेट

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य विभागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी व उद्योग जगताचे लक्ष लागून असलेली उत्तर महाराष्ट्र विभागाची निवडणूकही अखेर आजी-माजी अध्यक्ष व विश्वस्तांच्या मध्यस्थीमुळे बिनविरोध झाली आहे. नाशिकमधील उपाध्यक्ष व कार्यकारी सदस्यमंडळाच्या २१ जागांसाठी होणारी निवडणूक टाळण्यासाठी आजी-माजी अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी एकत्रित बैठक घेत परस्पर विरोधी गटात चेंबरचे उपाध्यक्षपद व शाखा चेअरमनपदाचे वाटप करून समेट घडवून आणले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची निवडणूकही बिनविरोध झाल्याची घोषणा चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

सारडा संकुल येथील महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष विक्रम सारडा, माजी अध्यक्ष हेमंत राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी एकत्र बसून सामंजस्याने उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकच्या कार्यकारिणी पदाच्या २१ जागांसाठी आजपर्यंतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून चेंबरच्या उपाध्यक्षपदासाठी सुधाकर देशमुख यांची तर सुनिता फाल्गुने यांची नाशिक शाखा चेअरमनपदी निवड करण्यात आली. को-चेअरमन पदी संधी संजय सोनवणे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चेंबरची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हेमंत गायकवाड, संदीप भंडारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

कार्यकारिणी सदस्य

हेमंत गायकवाड, कैलास आहेर, व्हिनस वाणी, संजय राठी, रवी जैन, रवींद्र झोपे, हेमंत कांकरिया, नेमिचंद कोचर, मनीष रावल, संजय महाजन, सचिन शहा, अंजु सिंघल, भावेश मानेक, राजेश मालपुरे, डॉ. मिथिला कापडणीस, स्वप्नील जैन, दत्ता भालेराव, राजाराम सांगळे, सचिन जाधव , मिलिंद राजपूत, प्रशांत जोशी यांना कार्यकारिणी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष विक्रम सारडा व हेमंत राठी यांच्यासह अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

 

कोट

चेंबरच्या बिनविरोध निवडणुकीने यापुढील काळात राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी बळ मिळणार असून महाराष्ट्र चेंबर त्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. उद्योग, कृषी व व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिकपणे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहेत.

- ललित गांधी, नवनिर्वाचित अध्यक्ष , महाराष्ट्र चेंबर

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक