शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेकडे? काँग्रेसचा इन्कार, जागावाटपाकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 09:50 IST

महाविकास आघाडीत पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिकमधील उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आक्रमक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: नाशिक शहरातील नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा उद्धव सेनेकडे गेल्याचे वृत्त आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी नाशिक पश्चिम मतदार संघातील इच्छुक उमेदवार सुधाकर बडगुजर आणि मध्य नाशिकमधील इच्छुक उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांना तातडीने मुंबईला बोलावून घेण्यात आले. त्यांना बुधवारी (दि.२३) ए बी फॉर्म देण्यात येणार आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षनेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अद्याप नाशिकमधील या दोन्ही जागांचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. यासंदर्भात बुधवारीच (दि.२३) अधिक स्पष्टता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिकमधील उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आक्रमक आहेत. नाशिक पश्चिममध्ये काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादी आणि माकप प्रयत्न करत आहेत तर मध्यमध्ये उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तिघांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. अन्य अनेक जागांवर एकमत झाले असले तरी या जागेबाबत मात्र एकमत होत नसल्याने तिन्ही पक्ष जागेची मागणी करत आहेत. दरम्यान, असे असले तरी उद्धव सेनेला हे दोन्ही जागा सुटल्याचे उद्धव सेनेने जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. मध्य नाशिकमधील इच्छुक उमेदवार वसंत गीते आणि नाशिक पश्चिममधील उमेदवार सुधाकर बडगुजर यांना मुंबईत ए बी फॉर्म घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. मंगळवारी रात्री दोघेही तेथे पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेण्यात आली. मात्र, बुधवारी (दि. २३) दुपारी उद्धव सेनेतील सर्व उमेदवारांना एकाच वेळी ए, बी, फार्म देण्यात येणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

आज काय ते ठरणार... 

काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षनेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अद्याप नाशिकमधील या दोन्ही जागांचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. यासंदर्भात बुधवारीच (दि.२३) अधिक स्पष्टता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीत पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिकमधील उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आक्रमक आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकnashik-central-acनाशिक मध्यMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी