शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

महाराजा श्री अग्रसेन जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:30 IST

समाजवाद, अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. काठेगल्ली येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे जयंतीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २९) संध्याकाळी पार पडला. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली.

नाशिक : समाजवाद, अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. काठेगल्ली येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे जयंतीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २९) संध्याकाळी पार पडला. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली.अग्रवाल सभा, नाशिकतर्फे महाराजा अग्रसेन यांच्या जन्मोत्सवानिमित्त रविवार कारंजा येथे प्रतिमेचे पूजन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार, नगरसेवक गुरुमित बग्गा, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष उमेश मुंदडा, आर्कि. सुरेश गुप्ता, राधेश्याम गुप्ता, अंकित अग्रवाल, मनीष अग्रवाल, शशी अग्रवाल, सपना अग्रवाल उपस्थित होते. आडगावच्या बालासुंंदरी माता मंदिरात श्रीपाल अग्रवाल यांच्या हस्ते, तर महात्मानगर येथे राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माल्यार्पण केले. अग्रसेन भवनमध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इमामी कंपनीचे उपाध्यक्ष दिलीप पोद्दार, सिन्नरच्या क्युपिड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ओमप्रकाश गर्ग उपस्थित होते. समाजाबरोबरच शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे यावेळी गर्ग यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी पोद्दार, युवा अध्यक्ष अंशुल अग्रवाल, ताराचंद गुप्ता आदी उपस्थित होते. सभेतर्फे विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. स्वागत संयोजक दुर्गेश गर्ग, रवींद्र केडिया यांनी केले. आभार महामंत्री विमल सराफ यांनी मानले. याप्रसंगी सोमबाबू अग्रवाल, श्याम ढेडिया, भगवानदास अग्रवाल, महेश सत्यप्रकाश आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘अग्रभागवत’ला उत्स्फूर्त प्रतिसादमहिला मंडळाच्या वतीने पूर्वसंध्येला उज्ज्वल अग्रवाल यांचे अग्रभागवत पठण या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी समाजबांधवांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला. कलाकारांनी नृत्यनाटिकेतून महाराजा अग्रसेन यांचा जीवनप्रसंग मांडला. यशस्वीतेसाठी शशी दिनेश अग्रवाल, नीरा अग्रवाल, संगीता अग्रवाल, ऋचिका चांद आदी प्रयत्नशील होते.यांचा झाला गौरवअग्रसेन विश्वस्त ट्रस्टतर्फे विविध विद्याशाखेतील मंजूषा पुरंदरे, ओमकार हांडे, अनिकेत गायकवाड, शांती सिंग, गौरव साळुंखे, शैली मौर्य, मोनाली पांजणकर, श्रुतिका अग्रवाल आदी गुणवंतांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक