शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नैताळेत मतोबा महाराजांची महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:37 IST

निफाड : नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची महापूजा व रथपूजा गुरूवारी (दि.२८) करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व स्वर्गीय शंकर केसु खलाटे यांचे वारसदार कुटुंब यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले.

ठळक मुद्देयात्रोत्सव साधेपणाने : धार्मिक कार्यक्रम, भाविक नतमस्तक

निफाड : नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची महापूजा व रथपूजा गुरूवारी (दि.२८) करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व स्वर्गीय शंकर केसु खलाटे यांचे वारसदार कुटुंब यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा नैताळे येथे पौष पौर्णिमेपासून अखंड १५ ते २० दिवस चालणारा श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव भरविण्यात आला नाही. मात्र श्री मतोबा महाराजांची महापूजा व रथ पूजा असा धार्मिक कार्यक्रम श्री मतोबा महाराज देवस्थानने आयोजित केला होता. यावेळी श्री मतोबा महाराजांची महापूजा करण्यात आली. यावेळी व्ही.एन. नाईक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, लासलगाव बाजार समितीच्या उपसभापती प्रीती बोरगुडे, संचालक वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, जिल्हा परिषेदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल, निफाडचे नगरसेवक दिलीप कापसे, विलास मत्सागर, उत्तम जाधव, महेश चोरडिया, भीमराज काळे, संदीप गारे, संजय घायाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्याक्ष भूषण धनवटे,मोहन खताळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचा श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे यांनी सत्कार केला.खलाटे बंधूंकडून जागा दानमहापूजेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी विठ्ठल खलाटे, रामभाऊ खलाटे, लक्ष्मण खलाटे, गंगाराम खलाटे, जगदीश खलाटे या खलाटे बंधूनी आपली मंदिराशेजारी असलेली जागा श्री मतोबा महाराज देवस्थानला दान केली आहे. तशी घोषणा महापूजेप्रसंगी करण्यात आली.लाडूच्या प्रसादाचे वाटपगुरुवारी पौष पौर्णिमेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद देवस्थानच्या वतीने वितरीत करण्यात आला. श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव बंद असला तरी भाविकांनी दर्शनास येताना सोशल डिस्टन्स ठेवावा व मास्क वापरावा, असे आवाहन श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट वतीने करण्यात आले आहे 

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक