शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

महंतांचा आता ‘कमर्शियल ब्रेक’!

By admin | Updated: August 17, 2015 23:45 IST

व्यावसायिक पवित्रा : चक्क पाण्याच्या बाटल्यांचे उद्घाटन अन् जाहिरातही

नाशिक : काही दिवसांपूर्वी ‘ते’ प्रशासनावर प्रचंड कोपले होते... कुंभमेळ्यातील असुविधांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत होते... हळूहळू त्यांचा राग शांत होऊ लागला... आता ते प्रशासनाच्या कामावर एवढे खूश आहेत की, ‘अशा सुविधांचा स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता’, अशी वाक्ये त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागली आहेत... असा सारा ‘सुखाचा’ काळ आल्यानेच बहुधा ते आता छोटासा ‘कमर्शियल ब्रेक’ही घेऊ लागले आहेत... त्यामुळेच चक्क पाण्याच्या बाटल्यांच्या कंपन्यांनाही त्यांचा ‘कृपाशीर्वाद’ प्राप्त होऊ लागला आहे...सतत माध्यमांच्या प्रकाशझोतात असलेल्या श्री महंतांचे हे वर्णन आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच श्री महंतांनी हिमालयातल्या एका बाबांवर आगपाखड केली होती. या बाबांनी साधुग्राममध्ये दुकानदारी थाटली असून, लोकांकडून असे पैसे गोळा करणे योग्य नसल्याची पुस्ती त्यांनी जोडली होती; मात्र याच महोदयांनी आता चक्क पाण्याच्या बाटल्यांच्या उत्पादनाचे उद्घाटन आणि जाहिरातही केल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावून गेल्या. या बाटल्या कुंभमेळ्यात ना फुकट वाटल्या जाणार आहेत, ना सवलतीत. मग महंतांची अशा एखाद्या व्यावसायिक उत्पादनावर ‘कृपादृष्टी’ कशासाठी, असा प्रश्न अनेकांना पडलाच; शिवाय महंतांच्या या ‘कमर्शियल ब्रेक’चेही आश्चर्य वाटून गेले. त्याचे झाले असे की, श्री महंतांची ‘तातडीची पत्रकार परिषद’ असल्याचे लघुसंदेश आज सायंकाळी पत्रकारांच्या भ्रमणध्वनीवर झळकले. ध्वजारोहण दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना, असा निरोप मिळाल्याने झाडून सारे पत्रकार महंतांकडे धावले खरे; पण पत्रकार परिषदेऐवजी एका कंपनीच्या मिनरल वॉटरच्या उत्पादनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमच तेथे पाहावयास मिळाला. खुद्द महंतांच्या शुभहस्ते पाण्याच्या बाटल्यांचे उद्घाटन झाले. महंतांनी मोठ्या थाटात लाल रिबिनीची गाठ काढत पाण्याची एक बाटली हातात घेतली. मग एका हातात बाटली अन् दुसऱ्या हाताने त्याच बाटलीला आशीर्वाद असे फोटोसेशन झाले... जरा वेळाने महंतांनी या कंपनीचे गुण गाण्यास सुरुवात केली. या बाटल्यांतील पाणी थेट त्र्यंबकेश्वरहून आणले गेल्याचे दाखलेही दिले गेले... तेवढ्यात योगायोगाने ठसका लागला, महंतांनी बाटलीतले दोन घोट पाणी प्राशनही केले अन् कंपनीच्या अधिकाऱ्यांना धन्य झाल्याचीच अनुभूती आली... या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांना मात्र काही दिवसांपूर्वी ‘समोरच्या’ बाबांना फटकारणारे ते हेच का, असा प्रश्न पडून गेला... (प्रतिनिधी)