शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महानुभाव पंथाचे महंत कारंजेकरबाबा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:27 IST

महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते.

नाशिक : महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते. महानुभाव पंथातील विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा प्रमुख सहभाग होता.कारंजेकरबाबा यांनी दहा वर्षे महानुभाव परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. या कार्यकाळ त्यांनी महानुभाव पंथाच्या प्रचार, प्रसार आणि प्रबोधन कार्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. मूळचे नवी दिल्ली येथील रहिवासी असलेल्या कारंजेकरबाबा यांनी बालवयातच पंथीय ब्रह्मविद्या शास्त्राचे धडे गिरविले. कालांतराने अमरावती येथे त्यांना कविश्वर कुळाची कुलाचार्य महंती प्राप्त झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टÑात तसेच नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात महानुभव पंथियांची श्रीकृष्ण, श्रीदत्त आणि श्रीचक्रधर स्वामींची शेकडो मंदिरे स्थापन झाली. नाशिक जिल्ह्यातील सुकेणे येथील श्री दत्त मंदिराला त्यांनी अनेक वेळा भेट दिली होती.नाशिक, नगर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय महानुभव पंथीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. राज्यभरात त्यांचा शिष्य परिवार असून, दरवर्षी भानखेडी येथे त्यांच्या प्रवचन सोहळ्याला लाखो सद्भक्त हजेरी लावत असत.त्यांच्या जाण्याने पंथाची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत बीडकरबाबा आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू