शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:48 IST

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा तोडगा : जनतेचा आवाज ऐकणार; शिक्षण संस्था, शेतकरी, औद्योगिक संघटनांशी करणार चर्चा

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळसाहेब सानप आणि आमदार सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भेट घेतली आणि शहरातील करसमस्येविषयी माहिती दिली. महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून सर्व निवासी मिळकती तसेच शेती व औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्षण संस्थांच्या मिळकतींवर करवाढ लागू केली आहे. त्यामुळे कृती समिती, मी नाशिककर अशा विविध नावांखाली संस्थांनी संघटन करून विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच नाशिक शहरातील वातावरण सत्तारूढ भाजपाच्या विरोधात जात असून, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आता नाशिकमध्ये आमदार सानप आणि सीमा हिरे सहभागीही झाले आहेत. याशिवाय निमा, आयमा, वकील अशा व्यावसायिकांच्या संघटनांनीदेखील करवाढीच्या विरोधात आंदोलनांना पाठिंबा दिला आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांना करवाढीबाबत भाजपाचे शिष्टमंडळे भेटून उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता भाजपा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा धावा सुरू केला आहे. मंगळवारी (दि. १७) याबाबत आमदारद्वयींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि शहरात करामुळे निर्माण झालेल्या उद्रेकाविषयी माहिती दिली. त्यावर चालू आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौºयावर येणार असून, ते सर्व शेतकरी, शिक्षण संस्थाचालक, औद्योगिक संघटना आणि अन्य नागरी संघटनांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या भावना आणि अडचणी समजावून घेऊन ते प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे सीमा हिरे यांनी कळविले आहे. महापालिकेने केलेली करवाढ नियमित घरपट्टीत १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बिगरनिवासी आणि औद्योगिक क्षेत्रातही भरीव वाढ केली असून, ती ८३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. याशिवाय नवीन मिळकती तसेच खुल्या भूखंडासाठी भाडेमूल्य निश्चित करण्यात आले असून, त्यामुळे नव्या मिळकतींना करवाढीचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खुल्या भूखंडावरील करवाढीमुळे शेती क्षेत्रावर कर लागू होणार तो किमान ६५हजार प्रति एकर असेल, असे सांगितले जात आहे.