शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:35 IST

राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाशिक : राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी खासगी आणि शासकीय डॉक्टरांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत यावेळी बंग यांनी व्यक्त केले.  सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने देण्यात येणाºया या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, देणगीदार डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, यांच्यासह सभागृहात महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. आदी मान्यवर उपस्थित होते. बंग यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख तसेच मानपत्र, स्मृतिचिन्ह महाजन यांना प्रदान करण्यात आले.यावेळी बंग यांनी महाजन यांची जीवनशैली आदर्श असल्याचे सांगून अशाचप्रकारे स्वस्थ जीवन जगण्यासाठी व विमा कंपन्यांच्या भरवशावर न राहता आदर्श जीवनशैली आचरणात आणावी असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या आरोग्य स्थितीवर बोलताना त्यांनी आजच्या वैद्यकीय व्यवसायाची स्थिती बघता रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक ठरत आहे. देशातील केवळ सात टक्के लोकांचा वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास टिकून आहे ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. देशाला डॉक्टरांची मोठी गरज आहे असे सांगून वैद्यकीय क्षेत्राविषयी सर्र्वसामान्यांच्या मनात असलेला संशय व भीती जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व रुग्णामध्ये निरोधी संबंध निर्माण होणार नाही, असे बंग यावेळी म्हणाले.  पुरस्काराला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी सावानाच्या या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे व यापुढे अधिक दमदारपणे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार आहे,अशा भावना व्यक्त केल्या.प्रारंभी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी कार्यक्षम आमदार पुरस्कारामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन अ‍ॅड. भानूदास शौचे यांनी केले. कार्याध्यक्ष अभिजीत बगदे यांनी स्वागत व प्रास्ताविक यांनी केले.प्रकट मुलाखतीत व्यक्त केल्या भावनासरकारने शेतकºयांना वीज, पाणी ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजप सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आत्महत्या या नैराश्यापोटी होत असून, निसर्गाचा लहरीपणा या नैराश्याला कारणीभूत जरी असला तरी हे एकमेव कारण असू शकत नाही, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत महाजन यांनी या भावना व्यक्त केल्या. मुखत्यारसिंह पाटील व ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी मुलाखत घेतली.

टॅग्स :Nashikनाशिक