शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

शंभर रॅलींच्या माध्यमातून स्वच्छतेचा महाजागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:15 IST

स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देमहास्वच्छता अभियान : शाळांच्या परिसरात जनजागृतीपर उपक्रम

नाशिक : स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरीच ब्यूरोतर्फे शिक्षण विभागाच्या सहकार्याने महास्वच्छता या अभियानाचे आयोजन करण्यात आले. अभियानाचा शुभारंभ गंगापूररोड येथील मराठा हायस्कूल येथे करण्यात आला. यावेळी जि. प. शिक्षण सभापती यतिंद्र पगार, के.टी.एच.एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. वी.बी. गायकवाड, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, जि. प.चे उपशिक्षणाधिकारी के. डी. मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, पर्यवक्षेक एस. बी. सोमवंशी, एन. एफ. बोराडे, ए. बी. ठुबे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पगार म्हणाले, देशाला समृद्ध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे. ग्रामीण भागात शौचालयाच्या वापराबाबत प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले.शासन शौचालयासाठी निधी देत असून, शौचालयाचा वापर योग्यपद्धतीने करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी रिजनल आउटरीच ब्यूरोच्या कला पथकाने स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छतेच्या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा