शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

महाजन बंधूंची ‘सी टू स्काय’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:30 IST

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून सीपीआर (जीवन संजीवनी) तंत्राची जगभर जनजागृती करण्यासाठी महाजन बंधू फाउंडेशनच्या वतीने दि. ३१ पासून मुंबई ते काठमांडू पर्यंत ‘सी टू स्काय’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहृदयविकार जनजागृती : नाशिक ते काठमांडू सायकलिंग

सातपूर : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून सीपीआर (जीवन संजीवनी) तंत्राची जगभर जनजागृती करण्यासाठी महाजन बंधू फाउंडेशनच्या वतीने दि. ३१ पासून मुंबई ते काठमांडू पर्यंत ‘सी टू स्काय’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाजन बंधूंनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.सातपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. महाजन बंधूंनी सांगितले की, सीपीआर तंत्राची जनजागृती करणे, जीवन वाचविण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित करणे, जीवन संजीवनी उपक्र माची माहिती देण्यासाठी दि. ३१ मार्चपासून मुंबई (समुद्र सपाटीपासून) ते काठमांडूपर्यंत सायकलिंग, ट्रेकिंग (एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत), गिर्यारोहण (माउंट एव्हरेस्ट सर करणे २९ हजार २८ फूट स्काय लेव्हल) अशा ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.जगभरातून आलेल्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट बेस कॅम्प काठमांडू येथे जीवन संजीवनीचे प्रात्यक्षिके दाखविले जाणार आहेत. यसाठी सहभागी होणाऱ्या सायकलपटूंची तयारी करून घेण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी आपली नावे नोंदणी करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत महाजन बंधूंसह नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, कल्पतरू फाउंडेशनचे डॉ. शरद पाटील, गुरु देवसिंग बिर्दी आदी उपस्थित होते.दि.३१ मार्च रोजी गेट वे आॅफ इंडिया सरदार तारासिंग उद्यान मुलुंड येथून मोहिमेला प्रारंभ होईल. तेथून नाशिक, धुळे, इंदूर, भोपाळ, कानपूर, लखनऊ, नेपाळ, काठमांडू आणि पुढे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्यासाठी दि.८ एप्रिलपासून ट्रेकिंगला सुरुवात केली जाणार आहे. नऊ दिवसांत एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकCyclingसायकलिंग