ओझर : अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधत ओझर शहर शिवसेना व गावातील नागरिकांनी मारु ती वेस येथील गोरेराम मंदिरात महाआरती केली.बुधवारी (दि.५) सकाळी मुहूर्त जसा जसा जवळ येत गेला तसा राम नामाचा जागर घराघरात सुरू होता. अनेक परिवारानी १२.४४ च्या शुभमुहूर्तावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर गोरेराम मंदिरात उपशहरप्रमुख अमित कोळपकर यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती संपन्न झाली. यावेळी ग्रामपालिका सदस्य प्रकाश महाले, शहरप्रमुख नितीन काळे, डॉ.अशोक लद्धा, कमेश शिंदे, प्रशांत चौरे, गुणेंद्र तांबट, दीपक शिरसाठ, नरेन थोरात, विशाल मालसाने, रवींद्र पगार, तेजस बोरा, आकाश भवर, प्रतीक लद्धा, प्रशांत गोसावी, रोहित लभडे, अजय ताडे, चेतन बोराडे आदींसह गावातील नागरिक व महिला उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:26 IST
ओझर : अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधत ओझर शहर शिवसेना व गावातील नागरिकांनी मारु ती वेस येथील गोरेराम मंदिरात महाआरती केली.
शिवसेनेच्या वतीने महाआरती
ठळक मुद्देओझरला गावात फटाक्यांची आतषबाजी