त्र्यंबकेश्वर : मध्य प्रदेशामधून कामासाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही, म्हणून हे मजूर एका ट्रकमधून आपल्या घराकडे निघाले असताना ट्रकचालकाने कारवाईच्या भीतीने अंबोली चेक पोस्टजवळ त्यांना उतरवून दिले. पायी निघालेल्या या मजुरांना पोलिसांनी रोखले. समज देऊन माघारी पाठविले.याबाबतची माहिती दुसऱ्या दिवशी श्रमजीवी संघटनेचे तुकाराम लचके यांना मिळाली. त्यांनी त्या सर्व कामगारांना चहापारी दिला व तहसीलदार यांना कळविले. सकाळी ८ वाजता याबाबत माहिती प्रशासनाला देऊनदेखील अजून कोणीही आले नव्हते. या कामगारांच्या व्यवस्थेबाबत तालुका प्रशासनाने हात वर केले.त्या कामगारांना परत पालघरला पाठवा, असे पोलिसांनी सांगितले. पण यासंदर्भात मला असा कुठलाच फोन आला नसल्याचा तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले. यासंदर्भात आमचे अधिकारी पोलीस आहेत, ते योग्य ते निर्णयघेतील. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांना इथे का थांबविले ते पायी चालले होते तर तुम्ही का त्यांना इथे थांबविले असे उलट प्रश्न आमच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केले असे सांगून या कामगारांची तत्काळ व्यवस्था करावी याबाबत उपविभागीय अधिकारी यांनाही विनंती केली असे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पण कोणी आले नाही. ते मजूर परत पालघरला गेल्याचे समजते.मूळचे मध्य प्रदेशातील असलेले कामगार पालघर येथे कामासाठी आले होते. लॉकडाउनमुळे कामे नसल्याने ते परत मूळगावी निघाले, कोणतेच वाहन नसल्याने ते पायी प्रवास करत होते. रस्त्यात त्यांना एक ट्रक मिळाला. ट्रकचालकाने सर्व कामगारांना अंबोलीजवळ आणून सोडले. हे कामगार आपली लहान मुले घेऊन पायी निघाले. मात्र त्यांना पोलिसांनी पुढे जाण्यापासून अडविले. रात्र त्यांना तिथेच काढावी लागली.
मध्य प्रदेशाच्या मजुरांना माघारी फिरविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:19 IST
मध्य प्रदेशामधून कामासाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही, म्हणून हे मजूर एका ट्रकमधून आपल्या घराकडे निघाले असताना ट्रकचालकाने कारवाईच्या भीतीने अंबोली चेक पोस्टजवळ त्यांना उतरवून दिले. पायी निघालेल्या या मजुरांना पोलिसांनी रोखले. समज देऊन माघारी पाठविले.
मध्य प्रदेशाच्या मजुरांना माघारी फिरविले !
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या वतीने चहापानाची व्यवस्था