शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

नाशिकचा संदर्भकोष मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

By धनंजय वाखारे | Updated: April 26, 2025 11:18 IST

नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते.

नाशिक : नाशिकचा चालता  बोलता संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे यांचे आज शनिवारी (दि. 26) पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यसमयी ते ८८ वर्षांचे होते.  नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी या नात्याने ते २८ वर्षांपूर्वी महापालिकेतून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यानंतरही सुमारे १० वर्षे ते मानद अधिकारी म्हणून कार्यरत होते. भूतपूर्व नगरपालिका तसेच १९८२ पासून स्थापित झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या अनेक स्थित्यंतरांचे मधुकर झेंडे साक्षीदार होते. 

१८५ वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या प्रगतीमध्ये मधुकर झेंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. सामान्य कार्यकर्ता ते सावानाचे अध्यक्ष अशी ४० वर्षांची प्रदीर्घ कामगिरी झेंडे यांनी केली. सन  २००८ ते २०१२ या कार्यकाळात त्यांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. १०१ वर्षांची अभिमानास्पद वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष पद देखील झेंडे यांनी भूषविले होते. 

भद्रकाली मार्केट परिसरात अत्यंत गरीब परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या मधुकर झेंडे यांनी लहानपणी मोहन मास्तर तालीम येथे व्यायाम करून शरीर कमावले आणि अनेक कुस्त्यांचे फडदेखील गाजविले. लोकरंजन कलाकेंद्राची स्थापना करून अनेक नाट्य कलावंतांना घडविण्याचे काम केले. लहानपणी विविध मेळयांमध्ये सहभागी होऊन झेंडे यांनी रंगमंच देखील गाजविला. लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड यासारख्या असंख्य सामाजिक संस्थांशी झेंडे यांचा निकटचा संबंध होता.

आण्णा अशी ओळख असलेल्या मधुकर झेंडे यांनी नाशिकच्या चौकांचा इतिहास हे संदर्भ कोष ठरलेले पुस्तक देखील लिहिले. नाशिकच्या सुमारे ७० वर्षांची वाटचाल मुखोद्गत असलेले मधुकर झेंडे हे नाशिकचा संदर्भकोष म्हणून देखील ओळखले जायचे. 

लोकशाहीर गजाभाऊ बेणी आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने मधुकर झेंडे यांनी १९६१ साली नाशिकच्या शिवाजी उद्यानामध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा अर्धपुतळा उभारला होता. तेव्हापासून त्यांचे लता मंगेशकर आणि कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी, बिनाका गीतमालाचे प्रसिद्ध निवेदक अमीन सायानी यांसह अनेक दिग्गजांशी झेंडे यांचे घरोब्याचे संबंध होते. नाशिकच्या सहा कुंभमेळ्यांचे ते साक्षीदार होते. 

झेंडे यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र, मुलगी रेखा व रत्ना, जावई प्रकाश पाटील व आल्हाद वाघ, सून, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. मधुकर झेंडे यांच्या निधनामुळे समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. झेंडे यांचा अंत्यविधी शनिवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता नाशिक अमरधाम येथे होईल.

टॅग्स :Nashikनाशिक