कसबे-सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व सुंदरी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान) जाधव कबड्डी चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.कबड्डीचा अंतिम सामना पुरु ष गटात ब्रह्मा स्पोर्ट्स, आडगाव विरु द्ध नाशिक ग्रामीण पोलीस यांच्यात झाला. या स्पर्धेत ब्रह्मा स्पोर्ट्सने बाजी मारत ११,१११ रु पयांचे पारितोषिक पटकावले. नाशिक ग्रामीण पोलिसांना ७,१११ रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. तर तृतीय पारितोषिक क्र ीडा प्रबोधिनी, नाशिक यांना प्राप्त झाले. पुरुष गटामध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले.महिला गटात क्र ीडा प्रबोधिनी नाशिक गटाने शिवशक्ती आडगाव गटाचा पराभव केला. महिला कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक रचना क्रीडा मंडळ, नाशिक, तर चौथा क्र मांक रु द्र शंभू क्रीडा मंडळ, ओझर यांना प्राप्त झाला.महिला गटात एकूण १० संघांनी सहभाग नोंदविला. कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूंनादेखील गौरविण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रमुख आयोजक बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, छगन जाधव, चिंतामण जाधव, विजय जाधव यांनी प्रयत्न केले.
माधवराव पहिलवान क्र ीडामहोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:00 IST
कसबे-सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व सुंदरी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान) ...
माधवराव पहिलवान क्र ीडामहोत्सव उत्साहात
ठळक मुद्देकसबे-सुकेणे : कबड्डीत आडगावच्या ब्रह्मा स्पोर्ट्सने मारली बाजी