शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माधवराव गायकवाड पंचत्वात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:52 IST

मनमाड : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

ठळक मुद्दे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न मिळाल्याने नाराजी

मनमाड : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते, माजी आमदार माधवराव गायकवाड तथा बाबूजी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.१३) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘बाबूजी अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.शिवाजी नगर भागातील त्यांच्या निवासस्थानापासूून सजवलेल्या वाहनातून बाबूजींची अंत्ययात्रा काढण्यात आली. महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इंडियन हायस्कूल, रेल्वे स्टेशनरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एकात्मता चौक मार्गे काढण्यात आलेली अंत्ययात्रा पालिका इमारती समोर पोहोचली असता पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी दिलीप मेनकर, गटनेते गणेश धात्रक यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. एकात्मता चौकात व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष राजाभाऊ पारीक व व्यापारी वर्गाने पुष्पहार अर्पण केले. गुरु गोविंद सिंग विद्यालया शेजारच्या मैदानावर बाबुजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या साधना यांनी अग्निडाग दिला. यावेळी भाकप चे राज्य सचिव तुकाराम भस्मे, भालचंद्र कांगो, लक्ष्मण नाईक, भालचंद्र बनसोड, राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, नीलिमा पवार, रवींद्र पगार, अनिल आहेर, राजाभाऊ देशमुख, संजय पवार, जगन्नाथ धात्रक, साहेबराव पाटील, मारु ती पवार, अफजल शेख, चंद्रकांत गोगड, कोंडाजी आव्हाड, गणेश धात्रक,शांताराम कातकडे, नितीन पांडे, नारायण पवार, जय फुलवानी आदी मान्यवर उपस्थित होते.चाहत्यांमध्ये नाराजीचा सूरमाधवराव गायकवाड हे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. त्या बरोबरच विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते असताना ही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांची अंत्ययात्रा मैदानावर पोहोचल्या नंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्या साठी नाशिक येथून पथक निघत असल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र आयोजकांनी त्यास नकार दिला. राज्य शासनाने हेतू पुरस्सर परवानगी देण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक