पेठ : एप्रिल महिना मध्यावर आला असताना कोरोनासोबत आता उन्हाचे चटकेही जाणवू लागल्याने रानावनात भटकाणाऱ्या पक्ष्यांची पाण्यावाचून होणारी गैरसोय लक्षात घेऊन आदिवासी युवकांनी एकत्र येत पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय केली आहे.सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाघमारे यांच्या संकल्पनेतून खोकरविहीर व परिसरात घराच्या कोनाड्यात पडलेल्या प्लॅस्टिक व पुठ्ठ्यापासून जवळपास २५ ठिकाणी झाडांवर अन्नपाण्याची सुविधा करण्यात आली. रोज सकाळी गावातील युवक अन्न व पाणी ठेवत असल्याने अनेक पक्ष्यांची तहान भागत आहे. या उपक्रमात कमलेश वाघमारे, महेश राऊत, मुरली चौधरी, गणेश जाधव, किरण मोरे, हुशार राऊत, कृष्णा वाघमारे, हनुमंतवाघमारे, मुरलीधर भडांगे आदी सहभागी झाले.
पक्ष्यांसाठी केली दाणापाणीची केली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:26 IST