शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:28 IST

आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. पारा सुरुवातीला हळूहळू घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे.

नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. पारा सुरुवातीला हळूहळू घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ९.५ अंशांवरून थेट ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला.  एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.गेल्या सोमवारी (दि.१७) किमान तापमानाचा पारा ८.५ अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तापमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता, मात्र सोमवारपासून पारा अधिक वेगाने खाली येऊ लागल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरल्यानंतर उत्तर महाराष्टÑदेखील थंडीने प्रभावित झालेला पहावयास मिळत आहे. सोमवारपासून पारा झपाट्याने खाली आल्याने नाशिककर थंडीने कुडकुडत आहे. दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. थंडीचा कडाका वाढताच शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले आहेत. एकूणच वाढत्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. हाडं गोठविणारी थंडी सध्या नाशिककर अनुभवत आहेत. बुधवारी तर थंडीने कहरच केला. मंगळवारी रात्रीपासूनच थंड वारे अधिक वेगाने वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे बुधवारी पहाटे थंडीने हाहाकार उडवून दिला.

टॅग्स :TemperatureतापमानenvironmentवातावरणNashikनाशिक