शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिला मंडळाचा लव्हली ग्रुप विकृताकडून ‘हॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:59 IST

शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या लव्हली महिला मंडळाचा ‘लव्हली हायटेक ग्रुप’ अज्ञात विकृत हॅकर्सकडून हॅक करण्यात आला असून, या ग्रुपच्या महिलांना मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर अश्लील पोस्ट सुरू झाल्याने ग्रुपमधील सर्वच महिलांच्या पायाखालील वाळू सरकली.

नाशिक : शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या लव्हली महिला मंडळाचा ‘लव्हली हायटेक ग्रुप’ अज्ञात विकृत हॅकर्सकडून हॅक करण्यात आला असून, या ग्रुपच्या महिलांना मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर अश्लील पोस्ट सुरू झाल्याने ग्रुपमधील सर्वच महिलांच्या पायाखालील वाळू सरकली. महिलांनी एकमेकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रुपमधील सर्वांचे भ्रमणध्वनी ‘स्विच आॅफ’ असल्याची सूचना कानी पडू लागल्याने महिलांना मोठा धक्का बसला. महिलांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन करीत तक्रार दिली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील महिलांचा लव्हली व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अज्ञात विकृताने हॅक केली. त्यामधील महिलांना सर्रासपणे अश्लील संदेश टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलाही बुचकळ्यात पडल्या. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल क्रमांक बंद येऊ लागले. दरम्यान, एका महिला सदस्याच्या भ्रमणध्वनीवर सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास संबंधित अज्ञात व्यक्तीने हाय, हॅलो करीत स्वत:ची ओळख ओम अशी सांगत पाकिस्तानमधून असल्याचा मेसेज केला आणि थेट ‘आप इंडिया के कौनसे सिटी से हो जी’ अशी माहिती विचारली. महिलेने पुन्हा नाव विचारले असता त्या विकृताने ओम कुमार असे नाव रिप्लाय केले. महिलेने पुढे संवाद थांबवून तत्काळ इंटरनेट बंद केले आणि सायबर पोलीस ठाणे गाठून त्या अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली. ग्रुप अ‍ॅडमिन महिला सदस्याने तत्काळ ग्रुपमधून सर्वांना लेफ्ट होण्यास सांगितले. ग्रुपमध्ये अचानकपणे सामील झालेल्या व्यक्ती थेट पाकिस्तानातील कशा असू शकतात? असा प्रश्नही महिलांना पडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून महिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम