शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नाशिक जिल्ह्यात टेहरेला चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 16:16 IST

आठ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

ठळक मुद्देअंगणात व घराच्या गच्चीवर झोपडलेल्या नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले

मालेगाव : शहरा लगतच्या टेहरे येथे दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी एकाच रात्री सात ठिकाणी धाडसी घरफोड्या करुन सुमारे आठ लाख रूपयांचे सोने व ८० हजारांची रोकड लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणांच्या सात घरांचा कडीकोंडा तोडून चोरी केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी (दि.२०) रात्री दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी गावाची टेहळणी केली. अंगणात व घराच्या गच्चीवर झोपडलेल्या नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. विश्वास नानाजी शेवाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपटातील १८ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोने, पंकज भावराव शेवाळे यांचे ३ तोळे २ ग्रॅम सोने व ३५ हजार रूपये रोख, शिवाजी नारायण शेवाळे यांचे १ तोळे ८ ग्रॅम सोने व ५ भार चांदी तर अनिल मोतीराम शेवाळे यांनी मेडिकलच्या गल्ल्यात ठेवलेली ४५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली आहे. डॉ. राजेंद्र अरविंद देवरे, अशोक माधवराव शेवाळे, शशिकांत संतोष पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा चोरीचा प्रकार मध्यरात्री उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी सकाळी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांनी घटनास्थळांची पाहणी केली. दुपारी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात विश्वास शेवाळे यांच्या फिर्यादीवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी