शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीव गमवला; पैशांचा पाऊस पडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:10 IST

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पाच लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. या प्रकारासाठी निवृत्त कर्मचाºयाने उसनवारीने घेतलेले पैसे परत करता न आल्याने त्यांनी मानसिक त्रासातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पंचवटी : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पाच लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. या प्रकारासाठी निवृत्त कर्मचाºयाने उसनवारीने घेतलेले पैसे परत करता न आल्याने त्यांनी मानसिक त्रासातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात माळेकर यांनी पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषाला भुलून आपल्या जमा पुंजीसह उसणवारीने घेतलेले पैसेही पणाला लावले, मात्र पैशाचा पाऊस तर पडलाच नाही उलट त्यांना मानसिक त्रासातून आपला जीव गमावाव लागल्याची घटना घटल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगरमधील गोकुळ रघुनाथ माळेकर यांनी याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माळेकर यांचे वडील रघुनाथ माळेकर (५७) यांना काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी अनिल कांबळे, परदेशी, खेताडे, पेंटर व कांबळे यांच्या बहिणीचा सासरा(पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशांनी माळेकर यांना भेटून तुम्ही पाच लाख रुपये द्या, आम्ही पैशांचा पाऊस पाडतो असे आमीष दाखविले. या आमिषाला बळी पडून माळेकर यांनी स्वत:चे तसेच इतरांकडून जमा केलेले पाच लाख रुपये संशयितांना दिले. काही दिवसांनी संशयितांनी माळेकरांना पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अज्ञातस्थळी नेले. येथे माळेकर लघुशंकेसाठी गेले असता संशयितांनी त्यांना काम झाले असे सांगून ते परत निघाले. त्यामुळे माळेकर यांनी माझे पाच लाख रुपये परत करा, असे सांगताच संशयित आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माळेकर यांनी मानसिक त्रासातून शनिवारी (दि.२१) राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी (दि.२३) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे तपास करीत आहे.चिठ्ठीमुळे प्रकरणाची उकलएसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी रघुनाथ माळेकर यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांना गंडा घातल्याने माळेकर यांनी विषारी औषध सेवन केले. मात्र त्यांनी या घटनेमागील हकिकत एका चिठ्ठीत लिहून ठेवली होती. विषारी औषध सेवन केल्यानंतर माळेकरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्या खिशात ती चिठ्ठी आढळून आली. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी