शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांसह हरविलेली बॅग माहेरवाशिण महिलेच्या  पुन्हा पदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 14:29 IST

या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिकरोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिकरोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शोध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले.

ठळक मुद्देरक्षाबंधनासाठी शहरात आल्या असता रिक्षात पडला विसरपोलिसांनी घेतला शोध

नाशिक : मुंबईहुन नाशिक शहरात आपल्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या औचित्यावर ओवाळण्यासाठी दाखल झालेल्या एका माहेरवाशिण अनावधानाने दागिने, रोकड असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. घरी गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी ठक्कर बाजार बसस्थानकापासून रिक्षा केल्याने थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार घेत तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी त्र्यंबकनाका परिसरात केली आणि रिक्षा वर्णनावरुन शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासांत दागिन, रोकड असलेली बॅग सुरक्षितरित्या पदरी पडल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मनीषा प्रकाश मेहता या बसमधून मुंबईतून दाखल झाल्या. येथून त्यांनी कस्तुरबानगर येथे माहेरी जाण्यासाठी रिक्षा केली. दागिने, रोकड ज्या बॅगेत त्यांनी ठेवलेली होती, ती बॅग अनावधानाने मेहता या रिक्षातच विसरल्या. घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी सर्व बॅग तपासल्या तेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आणि आता दगिने हरविल्याने सासरी काय सांगायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्याने त्या तणावाखाली आल्या. काही वेळेतच आपल्या नातेवाईकांसह त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. तत्परतेने गुन्हे शोध पथकाने त्र्यंबकनाका गाठले. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत रिक्षा मेहता यांनी ओळखली. या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिकरोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिकरोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शोध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले. बॅग उघडून दागिने, रोकड सुरक्षित असल्याची पोलिसांनी खात्री पटविली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारदार मेहता यांना ही बॅग परत करण्यात आली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे माहेरवाशिण महिलेला तिचे हरविलेले दागिने, रोकड पुन्हा मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयauto rickshawऑटो रिक्षाRaksha Bandhanरक्षाबंधन