शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या हिरेजडित दागिन्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:37 IST

शहर व परिसरात घरफोडी, दुचाकींची चोरी, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून, गंगापूररोडवरील सावरकरनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील ‘शिल्प’ बंगल्याच्या किचनचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाख दहा हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

नाशिक : शहर व परिसरात घरफोडी, दुचाकींची चोरी, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून, गंगापूररोडवरील सावरकरनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील ‘शिल्प’ बंगल्याच्या किचनचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाख दहा हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावरकरनगर येथे राहणारे प्रतीक सुशील चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भूखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंगल्यात पाठीमागील बाजूने किचनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.बंगल्यातील लाकडी कपाट तोडून त्यातील लहान तिजोरी फोडून दागिने भामट्याने लंपास केल्याचे चक्रनारायण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्याने वीस तोळे वजनाची सोन्याची सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ४५ हजारांच्या सोन्याच्या प्रत्येकी ४० ग्रॅमच्या नऊ बांगड्या, ४० हजारांचे कानातील खडे असलेल्या दोन रिंग, ३० हजारांच्या गळ्यातील सोन्याचे पॅँडल, १० हजारांच्या कानातील पाच ग्रॅमच्या रिंगा, एक लाखाचे गळ्यातील अ‍ॅमरॉल्ड पॅँडल, ३० हजारांचे गळ्यातील हिरेजडित पॅँडल, एक लाखाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ४५ हजारांचा तीन तोळ्याचा हार, ६० हजारांच्या चार तोळ्यांच्या बांगड्या, ५० हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.गुन्हेगारांची दहशत; संध्याकाळी घरफोडीसावरकरनगर, गंगापूररोड परिसर, नृसिंहनगर, आकाशवाणी टॉवर या भागात या जबरी घरफोडीच्या गुन्ह्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घर बंद करून जाणेदेखील धोक्याचे ठरूलागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. गंगापूर पोलीस ठाण्याकडून या भागात पोलीस गस्त थंडावली असून, मोकाट गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण चोरट्यांची मजल इतकी वाढली आहे की त्यांनी शारदाननगर येथील शिल्प बंगल्यातील तिजोरी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लुटून नेली. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील बंद राहणाºया घरांची सुरक्षितता अधिकच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. या गुन्ह्यात अद्याप एकाही संशयिताला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी