नाशिक : शिवाजीनगर परिसरात एका शेतामधील खोलीत लाखो रुपये किमतीचा फटाक्यांचा अवैधरीत्या साठा करण्यात आल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने दुपारच्या सुमारास शिवाजीनगर येथील राजाराम पाटील यांच्या शेतावरील संशयास्पद खोलीची झडती घेतली. यावेळी २४ लाख रुपये किमतीचे फटाके आढळून आले. फटाके खरेदी केलेल्या पावतीवर कैलास जाधव यांचे नाव आढळून आल्याने पोलिसांनी जाधव यांच्यावर विनापरवाना स्फोटक पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या फटाक्यांच्या साठ्याबाबत अग्निशमन विभागाकडून परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबतही पोलिसांनी चाचपणी केली; मात्र अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारे फटाक्यांच्या साठवणुकीला परवानगी दिली नसल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ फटाक्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केल्याची माहिती देवीकर यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
पाच पंचायत समित्यांमध्ये कमळ फुलणार
By admin | Updated: March 14, 2017 00:15 IST