शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खाणमाफियांवर ठेवणार ‘ड्रोन’च्या माध्यमातून नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:03 IST

मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असलेल्या सारूळ व राजूर बहुला येथील खाणपट्ट्यातून होणारा दगडांचा वारेमाप उपसा व त्याआधारे चालविल्या जाणाºया बेकायदेशीर खडीक्रशरमधून होत असलेली गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी हरतºहेचे उपाय करूनही यश मिळत नसल्याचे पाहून अखेर ड्रोनच्या माध्यमातून सलग खाणपट्ट्यांवर नजर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी तांत्रिक मंजुरीही देण्यात आली आहे.

ठळक मुद्देगौणखनिज चोरीविरुद्ध मोहीम : सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असलेल्या सारूळ व राजूर बहुला येथील खाणपट्ट्यातून होणारा दगडांचा वारेमाप उपसा व त्याआधारे चालविल्या जाणाºया बेकायदेशीर खडीक्रशरमधून होत असलेली गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी हरतºहेचे उपाय करूनही यश मिळत नसल्याचे पाहून अखेर ड्रोनच्या माध्यमातून सलग खाणपट्ट्यांवर नजर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी तांत्रिक मंजुरीही देण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यात गौणखनिजाची होत असलेली चोरी महसूल खात्याची डोकेदुखी ठरली असून, गौणखनिज माफियांविरुद्ध वेळोवेळी कारवाया करूनही त्याला अटकाव बसत नसल्याचे सिद्ध झाले आहे किंबहुना माफियांकडून महसूल अधिकारी, कर्मचाºयांवर हल्ले करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यातील वाळू लिलाव बंद असतानाही वाळूची होणारी चोरी-छुपी वाहतूक, दगड, मुरूम, माती, खडीचा होणारा अनधिकृत उपसा पाहता, त्याला आळा घालण्याचे अनेकविध प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याला पूर्णत: रोखण्यात अपयश आले आहे. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला व सारूळ शिवारात अशा प्रकारच्या सुमारे २५ ते ३० बेकायदेशीर दगड खाणी असून, या खाणमाफियांनी अख्खा डोंगर गिळंकृत करून भूसुरुंगाचा वापर करीत जमिनीखालून शेकडो फुटावरून वारेमाप दगडांचा उपसा केला आहे. त्यातून काहींना जीव गमवावा लागला तर गौणखनिजाच्या चोरीतून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्याबरोबरच, विजेच्या अनधिकृत जोडणीतून यंत्रसामग्री चालविली जात आहे. मुंबई महामार्गावरून सहजपणे नजरेस पडणाºया या खाणींमध्ये दिवस-रात्र उपसा केला जात असला तरी, कारवाईसाठी जाणाºया पथकाचा सुगावा लागताच, माफिया पलायन करीत असल्यामुळे पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, शिवाय खाणींचा संपूर्ण परिसर जीविताच्या दृष्टीने असुरक्षित असल्यामुळे तेथे जाण्याचे धाडसदेखील करण्यास कोणी धजावत नसल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सारूळ व राजूर बहुला येथील खाणींवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचा निर्णय नाशिक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी घेतला आहे. ड्रोनच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणची पाहिजे तेव्हा पाहणी करता येईल.पुलांवर लावणार सीसीटीव्ही कॅमेरेखाणमाफियांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबरोबरच, अन्य गौणखनिजाची शहरातून केल्या जाणाºया बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी नाशिक शहरात प्रवेश करणाºया प्रमुख रस्त्यांवर व विशेषत: पंचवटीतील कन्नमवार पुलावर मालेगावकडून येणाºया वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचारही प्रशासनाने गांभीर्याने सुरू केला आहे. या कॅमेºयांच्या माध्यमातून गौणखनिजाच्या वाहतुकीला आळा घालण्यास मदत होणार आहे. पुलाजवळच त्यासाठी कंट्रोल रूम उभारण्याचाही प्रस्ताव आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार