शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला पोलिसांची तळीरामांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:51 IST

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़ या थर्टी फर्स्टला शहरात पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने तळीरामांची तपासणी केली जाणार आहे़

ठळक मुद्देड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़ या थर्टी फर्स्टला शहरात पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने तळीरामांची तपासणी केली जाणार आहे़

राज्य सरकारने ३१ डिसेंबर रोजी बिअर व वाइन शॉपी तसेच देशी दारू दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत तर दुसºया दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम/ बिअर बार उघडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील चार पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून, पोलीस ठाणेनिहाय विशेष गस्त पथक तयार करण्यात आले आहे़

पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाणे हद्दीत किमान तीन नाकाबंदी पॉइंट असून, त्यानुसार अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत़ पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाºयांना दोन फेजमध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे़ शहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणेरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवर ४२ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे़

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत केल्या जाणाºया नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पंधरा अधिकारी व २७२ कर्मचारी तैनात केले जाणार असून, १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़ यावेळी हुज्जत घालणाºया नागरिकांसाठी १३० बॉर्डी वॉर्न कॅमेराद्वारे छायाचित्रणही केले जाणार आहे़ तसेच पोलिसांच्या नजरेतून एकही मद्यपी वाहनचालक सुटणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे़

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाईथर्टी फर्स्टला वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़ या मशीनद्वारे शरीरात किती अल्कोहोल आहे हे समजणार असून, मद्यपी वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे़

 

चोख पोलीस बंदोबस्तकायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारे ३१ डिसेंबर साजरा करू नये़ शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार असून, दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत़ त्यामुळे नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याबाबत दक्षता घ्यावी़- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपआयुक्त, नाशिक

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक