शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकडे उद्योगाच्या दृष्टिकोनातून बघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:19 IST

राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते.

नाशिक : राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीत शेतीत एक वर्षात फायदा झाला, तर चार वर्षे नुकसान होत असल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे रोजगारही घटला असून, समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. यासाठी शेती क्षेत्राकडे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.  कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मराठा उद्योजक फोरमतर्फे आयोजित उद्योजक व नोकरी मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितल्यास शेतकऱ्यास अपेक्षित उत्पन्न मिळून इतरांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच शेतीचा विकास समाजातील नैराश्याचे वातावरण झटकण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. शेतीचे शास्त्र समजून घेत, शेती विषमुक्त करण्यासह उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपले काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून अल्पदरात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे यांनी व्यवसाय उभारणीसाठी विविध योजनांची माहिती दिली. तरुणांमधून उद्योजक घडणे काळाची गरज असल्याचे मत खासदार गोडसे यांनी व्यक्त केले.उद्योजकतेचा नारा द्यावाव्यवसाय करताना चांगली संकल्पना, विश्वासू सहकारी, आर्थिक नियोजन आणि कष्टाची तयारी या सर्व घटकांची योग्य सांगड घालणे गरज असून, उद्योजक होऊ पाहणाºया युवकांनी कष्टाला दिशा देण्याचा प्रयत्न होण आवश्यक असल्याचे मत संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. तरुणांनी कोणत्याही कामाला न लाजता अभिमानाने ‘कौशल्यनिपुन मराठा, उद्योजक मराठा’ असा नारा युवकांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी