यांच्याविरोधात गुन्हासिडको : सीटबेल्ट नसलेल्या कारचालकावर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ नायडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़१९) सकाळच्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पाथर्डी फाटा येथे वाहन तपासणी करीत होते़ यावेळी कारचालक अशोक काळे याने सीटबेल्ट न लावल्याने त्यास आर्थिक दंड करण्यात आला़ यानंतर प्रभाग सभापती सुदाम डेमसे व प्रशांत खरात हे तिथे आले व त्यांनी दंडात्मक कारवाई न करण्यास सांगून सरकारी कामात अटकाव केला़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात डेमसे यांच्यासह काळे व खरात यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्कसिडको प्रभाग सभापती डेमसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:22 IST