नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान ११ एप्रिल तर दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल, तीसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल आणि मतदानाचा अखेरचा चौथा टप्पा २९ एप्रिलला पुर्ण होत आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व ६ मेपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे रमजानच्या अगोदर राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपत आहे. तसेच काही राज्यांत रमजानकाळत मतदानाच्या तारखा येत असल्या तरी त्याचा फारसा परिणाम मतदानावर किंवा निवडणूक प्रक्रियेवर होणार नाही, असे मत नाशिक शहरातील सुन्नी मुस्लीम धर्मगुरूंनी व्यक्त केले आहे.निवडणूकांच्या तारखा रमजानकाळात जाहीर झाल्याने बोटावर मोजण्याइतक्या काही धार्मिक संघटनांनी आक्षेप नोंदविला होता. यामुळे नवा वाद उभा राहिला; मात्र निवडणूक आयोगाने या आक्षेपावर स्पष्टीकरण देत पडदा टाकला. यासंदर्भात नाशिकमधील काही धर्मगुरूंशी चर्चा केली असता त्यांनीदेखील मतदानप्रक्रिया आणि रमजान पर्वचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. नाशिक, मुंबईसह राज्यात रमजान पर्वच्या आठवडाभर अगोदर मतदानप्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे वाद उद्भवण्याचा किंवा कुठलाही अडसर निर्माण होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, असे मत स्थानिक धर्मगुरू व उलेमांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.---या जिल्ह्यांत या तारखांना लोकसभेचे मतदानपहिला टप्पा- ११ एप्रिल- ७ मतदारसंघवर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीमदुसरा टप्पा- १८ एप्रिल- १० मतदारसंघबुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.तिसरा टप्पा- २३ एप्रिल- १४ मतदारसंघजळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.चौथा टप्पा- २९ एप्रिल- १७ मतदारसंघनंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी.
Lok Sabha Election 2019; वाद निरर्थक : राज्यात ‘रमजान’पुर्व आटोपणार लोकसभेचे मतदान !
By अझहर शेख | Updated: March 12, 2019 14:46 IST
रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल,
Lok Sabha Election 2019; वाद निरर्थक : राज्यात ‘रमजान’पुर्व आटोपणार लोकसभेचे मतदान !
ठळक मुद्देमतदानप्रक्रिया आणि रमजान पर्वचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. राज्यात 'रमजान'च्या आठवडाभर अगोदर मतदानप्रक्रिया पूर्ण होत आहे