शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्याचे कुलूप उघडून पळविले ५१ लाखांच्या दागिण्यांचे लॉकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:27 IST

गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारे रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पत्ताच नाहीमंगळवारी उशिरापर्यंत पोलिसांना सुगावा लागलेला नव्हता

नाशिक : शहर व परिसरात घरफोडी, जबरी लूट, खंडणी वसूलीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास आयुक्तालयस्तरावरील पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या आनंदव्हिला बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिणे, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिणे व १ लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लूटून नेल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारे रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले. पावणेदहा वाजेच्या सुमारास लुथरा हे आपल्या आई, पत्नीसह घरी परतले असता घराचे कुलूप उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईने जेव्हा आपल्या बेडरूममधील कपाट उघडले तेव्हा, कपाटात ठेवलेले लॉकर गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब आपल्या मुलाला सांगितली. रोमेश यांनी बेडरूममध्ये जाऊन खात्री केली असता तिजोरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोमेश यांनी त्वरित घटनेची माहिती पोलिसांना कळविली. काही मिनिटांतच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. तत्काळ पोलिसांनी बेडरूममधील कपाटाचा पंचनामा केला. श्वान पथकासह न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. रोमेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरूध्द घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पत्ताच नाहीबंगल्यात किंवा आवारात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. संपुर्ण बंगल्याच्या परिसरात किंवा बाहेरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या गुन्ह्याबाबतचा कुठलाही सुगावा मंगळवारी उशिरापर्यंत पोलिसांना लागलेला नव्हता.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी