शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लॉकडाउनमुळे चविष्ट रानमेवा झाला बेचव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:04 IST

एप्रिल-मे महिना म्हटला की, ग्रामीण व विशेषकरून आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यांत सहजपणे उपलब्ध होणाºया विविध प्रकारच्या रानमेव्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. मात्र यावर्षी कोविड -१९ लॉकडाउनमुळे हा रानमेवाही काळवंडला असून, नकळत याचा फटका आदिवासी मजुरांना बसला आहे.

ठळक मुद्देखवय्यांचा भ्रमनिरास : पेठ, सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यातील आदिवासींचा रोजगार बुडाला

रामदास शिंदे।  लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : एप्रिल-मे महिना म्हटला की, ग्रामीण व विशेषकरून आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यांत सहजपणे उपलब्ध होणाºया विविध प्रकारच्या रानमेव्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. मात्र यावर्षी कोविड -१९ लॉकडाउनमुळे हा रानमेवाही काळवंडला असून, नकळत याचा फटका आदिवासी मजुरांना बसला आहे.नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण, इगतपुरी या तालुक्यांत मे महिन्याच्या तळपत्या उन्हाबरोबर करवंद, आवळा, आंबे, तोरणे, टेंभूर आदी जंगली रानमेव्याचे आगमन होत असते. मोठ्या प्रमाणात व सहज उपलब्ध होणाºया या रानमेव्यापासून मजुरांना ऐन उन्हाळ्यात चार पैसे गाठीशी बांधण्याची संधीही मिळत असते. शहरी भागातून खवय्ये खास या रानमेव्याची चव चाखण्यासाठी गावाकडे फेरफटका मारतात. मात्र यावर्षी सर्वत्र लॉकडाउनची स्थिती असल्याने दळणवळणाची सर्व साधने बंद आहे. शिवाय गाव-शहरात संचारबंदी लागू असल्याने यावर्षीचा रानमेवा झाडावरच राहिला.जळगावकरांना करवंदाची प्रतीक्षापेठ तालुक्यातून दरवर्षी जळगावपर्यंत करवंद पोहोच होत असल्याने यावर्षी वाहतूक व्यवस्था व जिल्हा बंदी असल्याने कोणीही मजूर करवंद तोडायला गेली नसल्याने करवंदाची निर्यात पूर्णपणे थांबली. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावकरांना पेठच्या करवंदाच्या चवीला मुकावे लागल्याचे दिसून येते. नाशिकसह जळगाव, चाळीसगाव, धुळे, मालेगाव आदी ठिकाणी पेठच्या करवंदांना दरवर्षी मोठी मागणीअसते.झाडावरच वाळली करवंदे !यावर्षी रानफळांना पोषक वातावरण असल्यामुळे व मागील वर्षी पाऊसही चांगला झाल्याने करवंद, आंबे, आवळा, तोरणे जास्त प्रमाणात आली. मात्र कोणीही जंगलाकडे फिरकले नसल्याने झाडावरच पिकून फळे वाळून गळून खराब होऊ लागली आहेत. आदिवासी भागात जास्त प्रमाणात येणाºया रानमेव्यावर प्रक्रि या करून त्याचे व्यावसायिकरण करण्याची मागणी करण्यात येत असून, यासाठी आदिवासी भागात प्रक्रि याउद्योग सुरू करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल व वनसंपदेचा योग्य उपयोग करून घेता येईल.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा