कवडदरा : स्पर्धेच्या या कालावधीत पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले. मात्र, कोरोनारूपी संकटाने किंबहुना लॉकडाउनने त्यांचे भवितव्य लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे नोकरीसाठी कठीण परिश्रम हे महत्त्वाचे मानले जाते. त्यादृष्टीने हजारो तरु ण, तरु णी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. काहींनी तयारी पूर्णही केली आहे. अनेक विभागाच्या जाहिराती पाहून अर्जही केले आहेत. मात्र, याच दरम्यान कोरोनाने आपले पाय पसरल्याने सुशिक्षति बेरोजगारांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे.कोरोनाने देश आण िराज्यांच्या तिजोरीवरही परिणाम झाला आहे. हाच परिणाम रोजगार भरतीवर होणार असल्याने आगामी परीक्षा कधी होणार याचे कोणतेही सोयरसुतक नाही. परिणामी, बेरोजगारांची फौज निर्माण होण्याची शक्?यता वर्तिवली जात आहे. रोजगाराची समस्या गावात जाणवणार आहे. देश, विदेश, राज्याच्या विविध भागांत कामानिमित्त गेलेल्या नागरिकांची पावले गावात परत आल्याने कुटुंब चालवायचा कसा, असा प्रश्न भेडसावत आहे.असे मत इगतपुरी तालुक्यातील कवडदरा,पिंपळगाव डुकरा,धामणगाव परीसरातील सुशिक्षति तरु णांना पडला आहे.मेहनत करून नोकरीवर लागणार्या युवकांचे पुरते मनोबल खचले आहे. शासनाने भरतीप्रक्रि या त्विरत राबवावी.- सुनिल रोंगटे, कवडदरा.शासनाने बेरोजगारांना बेकारी भत्ता द्यावा किंवा लवकरात लवकर परीक्षेचे नियोजन करावे.- प्रवीण निसरड, कवडदरा.तालुका शिक्षक संघटना सदस्य
लॉकडाउनमुळे "लॉक झाले भरतीपूर्व उमेदवारांचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:14 IST
कवडदरा : स्पर्धेच्या या कालावधीत पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले. मात्र, कोरोनारूपी संकटाने किंबहुना लॉकडाउनने त्यांचे भवितव्य लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.
लॉकडाउनमुळे लॉक झाले भरतीपूर्व उमेदवारांचे भवितव्य
ठळक मुद्देसुशिक्षति बेरोजगारांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले