शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्रीत घरे अन् दुकानांचे तोडले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:40 IST

गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे.

मातोरी : गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. येथील सुरेश पिंगळे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी संसारोपयोगी साहित्य पत्र्याच्या पडवीमध्ये स्थलांतरित केले होते. चोरट्यांनी पडवीत प्रवेश करून पत्र्याच्या पेटीतून सुमारे तीन लाखांचे दागिने लांबविल्याची घटना पहाटेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.मातोरीमध्ये चोरट्यांनी हैदोस घातला असून, ग्रामीण भागात चोरट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या मातोरी, मुंगसरा, दुगाव, गिरणारे, चांदशी या गावांमध्ये चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मातोरीमधील सुरेश निवृत्ती पिंगळे यांच्या मळ्यात पत्र्याच्या पडवीमध्ये घुसखोरी करून अज्ञात चोरट्यांनी तीन लाखांचे दागिने, सात हजाराची रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. पहाटेच्या सुमारास पिंगळे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांना माहिती कळविली. त्यांनी त्वरित तालुका पोलिसांना माहिती दिली. यानंतर उपनिरीक्षक नेहेते यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.याप्रकरणी पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गस्त थंडावली, चोरटे मोकाटदरी-मातोरी परिसरात रात्रीच्या वेळी तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या भागात गस्त थंडावल्याने चोरट्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे मिळाले आहे. मातोरी गाव हे शेतकरी व शेतमजूर क ष्टकºयांचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभर काबाडकष्ट करून गाढ झोपी जाणाºया गावात रात्री चोरटे हैदोस घालत असल्याने संताप व्यक्त होत आहे.मातोरी गावात चोरट्यांनी पिंगळे यांच्या घरात हात साफ केल्यानंतर बंद दुकानांना लक्ष्य केले. रफिक कादरी यांच्या दुकानाचे कुलूप कटरने कापून दुकानातील किमती वस्तूंसह गल्ल्यातील सहा हजाराची रोकड लंपास केली. तसेच अन्य दोन दुकानांमध्येही चोरट्यांनी अशाच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या दुकानांमधून रोकड हाती लागली नाही. गावात एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोरीच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ‘जागते रहो’ असे गावकरी एकमेकांना सांगताना दिसून आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी