मनमाड : इंधन कंपन्यांकडून इंधन चोरीला आळा बसविण्याबाबत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही इंधन चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर टॅँकरला हायटेक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम लॉक बसविण्याचा निर्णय भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पातील प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.इंधन चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने भारत पेट्रोलियम कंपनी प्रशासनाने पेट्रोलियम एक्स्पोजीव सेफ्टी लॉक ही नवीन सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या सिस्टीममध्ये कुलूप आणि चावी या दोन्हीमध्ये एक चीप बसविण्यात आली असून, तिला सॅटेलाइटने जोडण्यात आले आहे. पंपमालकाला कंपनीने दिलेल्या अॅपचा वापर करून कुलूप उघडता येणार आहे. गाडी पंपावर आल्यानंतर पंपमालकाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी टाकल्याशिवाय कुलूप उघडता येणार नसल्याचे सांगण्यात आले. या अत्याधुनिक पद्धतीमुळे टँकरमधून इंधन चोरीला पूर्णपणे आळा बसेल, असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केला.नागापूर-पानेवाडी परिसरात इंडियन आॅयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प आहेत. या तिन्ही प्रकल्पातून रोज सुमारे बाराशे टँकरच्या माध्यमातून राज्यभरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. इंधन चोरीला आळा बसविण्यासाठी सर्व टँकरला जीपीएस सिस्टीमने जोडण्यात आले आहे. त्यामुळे टँकर कुठे चालला याची माहिती कंपनीला मिळत असते.
टॅँकरला इलेक्ट्रॉनिक्स लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:20 IST
इंधन कंपन्यांकडून इंधन चोरीला आळा बसविण्याबाबत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही इंधन चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर टॅँकरला हायटेक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम लॉक बसविण्याचा निर्णय भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पातील प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
टॅँकरला इलेक्ट्रॉनिक्स लॉक
ठळक मुद्देमनमाड : इंधन चोरी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय