शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कंटेनर कारवर आदळला; तीन शिक्षकांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 22:11 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ जिंदाल कंपनीसमोर नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातातील कारमध्ये जिल्हा परिषद शाळांचे ५ शिक्षक आणि शिक्षिका होत्या. दुपारी साडेचार वाजता झालेल्या या अपघातात ३ शिक्षक जागीच ठार झाले, तर २ शिक्षिका गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ठळक मुद्देमुंढेगावजवळ अपघात : दोन महिला शिक्षकांची प्रकृती गंभीर

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ जिंदाल कंपनीसमोर नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातातील कारमध्ये जिल्हा परिषद शाळांचे ५ शिक्षक आणि शिक्षिका होत्या. दुपारी साडेचार वाजता झालेल्या या अपघातात ३ शिक्षक जागीच ठार झाले, तर २ शिक्षिका गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातस्थळी दाखल होऊन २ गंभीर जखमी शिक्षिकांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घोटी टोलनाका रुग्णवाहिकेने एका गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईहून येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे महामार्गावर नाशिककडून येणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. पलटी घेत घेत हा कंटेनर (क्रमांक एमपी ०९ एचएच ५९२०) कार (क्रमांक एमएच १५ सीएम ७५३२) या वाहनावर आदळला. त्यात कारमधील धनंजय कापडणीस (समनेरे), किशोर राजाराम पवार (धोंगडवाडी), ज्योत्स्ना टिल्लू (मालुंजे) हे शिक्षक जागीच ठार झाले. गीतांजली सोनवणे - कापडणीस (मालुंजे), शेवंता जगताप रकिबे (मालुंजेवाडी) या शिक्षिका गंभीर जखमी झाल्या. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारला कंटेनरचा धक्का लागल्याने त्यातील कारचालक किरकोळ जखमी झाला. अपघातातील सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक असल्याचे सांगितले जाते. मात्र, ते नाशिक येथे वास्तव्यास आहेत. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.वाहतूक काही काळ विस्कळीतअपघात ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. घोटीचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर, वाहतूक शाखेचे घोटी टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह उपनिरीक्षक संजय कवडे यांच्या पोलीस पथकाने तत्काळ धाव घेऊन जखमींना घोटी ग्रामीण व नाशिक येथे रवाना करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. कंटेनर महामार्गावरच आडवा पडल्याने तो उचलण्यासाठी पोलीस यंत्रणा व्यस्त होती.साडे पाच महिन्यांपूर्वीच्या घटनेचे स्मरणजिल्ह्यातील शिक्षकांवर काळाने घाला घालण्याची सहा महिन्यांतील ही दुसरी दुर्घटना आहे. २१ जुलै २०२१ रोजी नाशिक - कळवण रस्त्यावर वरखेडा फाट्याजवळ मोटारीवर वाळलेले झाड कोसळून दत्तात्रेय बच्छाव, रामजी भोये व नितीन तायडे या तीन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. हे तीनही शिक्षक सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील शहीद भगतसिंह माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते. बुधवारी मुंढेगावजवळ झालेल्या या दुर्घटनेत तीन शिक्षकांचा मृत्यू झाल्याने साडे पाच महिन्यांपूर्वीच्या या घटनेचे स्मरण झाले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात