शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्मकथन अंतर्मुख करणारे साहित्य :  ऋषिकेश कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:37 IST

दलित आत्मकथन हा त्या त्या लेखकाचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. पंडित पलुस्कर सभागृहात ‘वाबुकचा सम्यक संकल्प’ या आत्मकथन प्रकाशनप्रसंगी कांबळे बोलत होते.

नाशिक : दलित आत्मकथन हा त्या त्या लेखकाचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. पंडित पलुस्कर सभागृहात ‘वाबुकचा सम्यक संकल्प’ या आत्मकथन प्रकाशनप्रसंगी कांबळे बोलत होते.  यावेळी प्रा. कांबळे पुढे म्हणाले की, वामनराव करवाडे यांचे आत्मकथन हे विकार आणि विखारमुक्त असल्याने ते इतर आत्मकथनांपेक्षा अनोखे आहे. ग्रामसंस्कृती ते नागरी जीवनाचा अर्धशतकाचा इतिहास या लेखनातून व्यक्त होतो. प्रा. गंगाधर अहिरे याप्रसंगी म्हणाले की, प्रस्तुत स्वकथन हे धम्मानुगामी वृत्तीचे आहे. संयत आणि संयमित निवेदनामुळे या आत्मकथनातील आंबेडकरी विचारसृष्टी सुगमतेने वाचकाच्या मनाला भिडते. प्रा. छाया लोखंडे यांनी ग्रंथातील विविध प्रसंग कथन करून लेखकाचा जीवनपट उलगडून सांगितला. करुणासागर पगारे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, करवाडे यांच्या आत्मकथनातून आपला कुटुंबकबिला नीतिवान विचाराने कसा जतन केला पाहिजे, याचे मार्गदर्शन मिळते.  सरिता पाचपांडे यांनी प्रेरणा गीत सादर केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांंनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. रोहित गांगुर्डे यांनी करून दिला. डॉ. कांबळे यांना महाराष्ट्र राज्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा परिवर्त परिवारातील प्राचार्य रखमाजी सुपारे, कवी काशीनाथ वेलदोडे, अ‍ॅड. अशोक बनसोडे, कवी मधुकर  जाधव, प्रदीप जाधव, नितीन भुजबळ आणि श्यामराव बागुल यांनी सत्कार केला.  यावेळी पुष्पा करवाडे, गणेश साबळे, सुनील साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी  केले. माधुरी भोळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक