मालेगाव : मनपाच्या अंदाजपत्रकातील नियोजित विकासकामांना अटी-शर्ती लावून कामे रखडवित असल्याचा आरोप महापौर व नगरसेवकांनी मनपा आयुक्तांवर केला आहे. यावेळी महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अटी-शर्तींचे कागदे फाडीत आयुक्त महापौरांच्या दालनाबाहेर पडल्याने नगरसेवक व आयुक्तांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.महापौर रशीद शेख यांच्या दालनात अंदाजपत्रकात निर्धारित करण्यात आलेल्या विकासकामांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त यांनी विकासकामे करताना वॉर्ड अधिकारी, प्रभाग अधिकारी, अभियंता व इतर अधिकाºयांच्या पाहणीनंतरच विकासकामे केली जातील हा विषय चर्चेला आला. यावेळी विकासकामांना अटी-शर्ती लावल्याने कामे रखडली आहेत. महासभेतील मंजूर अंदाजपत्रकाला मनपा प्रशासन अंकुश कसे लावू शकते, असा सवाल नगरसेवक व पदाधिकाºयांनी उपस्थित केला. यावेळी महापौर शेख व आयुक्त धायगुडे यांच्या शाब्दिक चकमक झाली. यावेळी आयुक्तांनी अटी शर्तींची कागदे फाडीत दालनातून बाहेर पडल्या.या बैठकीला उपमहापौर सखाराम घोडके, शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर, एमआयएमचे गटनेते खालीद परवेझ, काँग्रेसचे नगरसेवक, सहाय्यक आयुक्त विलास गोसावी, उपायुक्त प्रदीप पठारे, प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
महापौर-आयुक्तांमध्ये शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:37 IST
मालेगाव : मनपाच्या अंदाजपत्रकातील नियोजित विकासकामांना अटी-शर्ती लावून कामे रखडवित असल्याचा आरोप महापौर व नगरसेवकांनी मनपा आयुक्तांवर केला आहे. यावेळी महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अटी-शर्तींचे कागदे फाडीत आयुक्त महापौरांच्या दालनाबाहेर पडल्याने नगरसेवक व आयुक्तांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
महापौर-आयुक्तांमध्ये शाब्दिक चकमक
ठळक मुद्देअटी-शर्तींचे कागदे फाडीत आयुक्त महापौरांच्या दालनाबाहेर विकासकामांवर चर्चा करण्यासाठी बैठक