शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दारू आणि जुगारबंदीचा महिला ग्रामसभेत एकमुखी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 17:52 IST

सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला.सरपंच सुनीता घेगडमल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महिला ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच गावास निर्णायक ठरणारे निर्णय घेण्यात आले. उपसरपंच मुकुंद बोडके, ग्रामसेवक जयवंत साखरे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ग्रामसभा घेण्यात आली. गावात व परिसरात अनधिकृतपणे दारू विक्र ी करणाºयांची संख्या मोठी असून, त्याविरोधात महिलांनी रणशिंग फुंकले आहे. गावातील तरुणांचे आयुष्य दारू आणि जुगाराने उद्ध्वस्त होत असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर महिलांनी ग्रामसभा घेऊन दारू व जुगारबंदी करण्याचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी पाठिंबा दर्शविला. ग्रामसभेत कुपोषण निर्मूलन, महिला-बाल कल्याण, स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ याविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ बोडके, शिवाजी साबळे, रूपाली बोडके, अनिता खोकले, ताईबाई बोडके, पोलीसपाटील शंकर कातकडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नारायण बोडके आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.प्लॅस्टिकबंदीचाही निर्णयपर्यावरणास हानिकारक ठरणाºया प्लॅस्टिकच्या वापराने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात कुणीही प्लॅस्टिक पिशव्या वापरणार नाही. त्याऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करून नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन यावेळी ग्रामसेवक जयवंत साखरे यांनी केले. सर्व ग्रामस्थांनी त्यास संमती देत या निर्णायाची आदर्श अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. 

टॅग्स :liquor banदारूबंदीNashikनाशिक