शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनचे आमीष दाखवून ज्येष्ठ महिलेचे एक लाखाचे दागिणे लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 18:23 IST

नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले.

ठळक मुद्देविश्वास संपादन करून पेन्शन सुरू करुन देण्याचे आमीष

नाशिक : ‘मुळ कागदपत्रे आणि दागिणे सोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवत भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे १ लाख ७ हजारांचे दागिणे घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संश्यित भामट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले. तेथे अज्ञात व्यक्तीने घासी यांना एका रिक्षात बसविले. त्यांना विविध शासकिय योजनांची माहिती सांगत विश्वास संपादन करून पेन्शन सुरू करुन देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये आवश्यक असल्याचे सांगूत त्या ज्येष्ठ महिलेजवळील ७५ हजार रुपयांची तीन तोळे वजनाची सोनसाखळी, ७ हजार रुपयांचे कानातील आभुषणे, १२ हजार ५०० रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पोत, तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण १ लाख ७ हजार रुपयांचे दागिणे घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात भामट्याचे वर्णन महिला घाबरली असल्यामुळे सांगू शकलेली नाही. तसेच महिलेने रिक्षाचा क्रमांकदेखील बघितला नसल्याने या भामट्याची ओळख पटविणे अवघड होत आहे; मात्र अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींचा गोपनिय माहितीच्या आधारे शोध सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांनी दिली.ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन चालू करण्याचे आमीष देऊन रक्कम अथवा दागिण्यांची मागणी करणाऱ्यांची माहिती संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यांना द्यावी. कुठल्याहीप्रकारे अमीषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी