शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

लिंगायत समाजाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:20 IST

नाशिकरोड : लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये उत्तर महाराष्ट्र सर्व लिंगायत समाजबांधव महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठीविभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला

नाशिकरोड : लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये उत्तर महाराष्ट्र सर्व लिंगायत समाजबांधव महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा, लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना इतर मागासवर्गीय आरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी रविवारी नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरातील स्टार झोन मॉल येथेउत्तर महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील महिला तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. यावेळी विविध जातीधर्मातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लिंगायत समाजाला विविध मागण्यांसाठी आपला पाठिंबा व्यक्त केला.लिंगायत समाजाचे नेते काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली शिखरेवाडी येथील स्टार झोन मॉल येथून महामोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. मध्यभागी एका रथामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या वेशभूषेतील कार्यकर्ता सहभागी झाला होता. त्यानंतर लिंगायत समाजबांधव ‘भारत देशाजी, बसवेश्वराजी’, ‘लिंगायत धर्म की जय’, ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत सहभागी झाले होते. एका रांगेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आला. त्यानंतर महामोर्चा लिंगायत संघर्ष समिती शिष्टमंडळ यांच्या वतीने सहायक आयुक्त संदीप माळोदे यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या महामोर्चात सरला पाटील, सुशीला आंदोळकर, शैला तोडकर, अनिल चौघुले, वसंतराव नगरकर, चंद्रशेखर दंदणे, प्रमोद वेरुळे, आनंद दंदणे, संदीप झारेकर, संजय फोलाणे, वसंतराव घोडके, अ‍ॅड. उमेश पाचपाटील, वैभव वाळेकर, रवींद्र गाडे, मनोज फत्तरफोडे, दुर्गेश भुसारे, अरुण आवटे, सिद्धेश्वर दंदणे, अरुण कस्तुरे, स्वप्नील कानडे, अरुण जोंधळे, प्रवीण झळके, सुनील कवाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी लिंगायत, माझा धर्म लिंगायतमोर्चेकऱ्यांनी मोर्चात मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ अशी घोषणा असलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. मोर्चेकºयांच्या हातात महात्मा बसवेश्वर फोटो छापलेले भगवे झेंडे होते. मोर्चामध्ये फलक व झेंडे घेऊन सहभागी झालेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या मोर्चाची सर्वत्र चर्चा सुरू होती.विशेष म्हणजे या महामोर्चात एक शंभर वर्षाच्या आजीबाई देखील सहभागी झाल्या होत्या.तर एका लहान मुलाच्या डोक्यावरील केसात मी लिंगायत अ‍ेस कोरलेले होते. एकंदरीत महामोर्चात अबालवृद्धाचा देखील सहभाग दिसून आला.