शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

चांदवड तालुक्यात रविवारी रात्रीच्या वादळी वाºयासह जोरदार पाऊसामुळे वीज व्यवस्था कोलमडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 16:42 IST

चांदवड : चांदवड तालुका व शहरात काल रविवारी सुमारे दोन तास जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर या वादळी वाºयामुळे झालेल्या पावसाने वीज व्यवस्था पुर्णपणे कोलमडली तर सुमारे १२ तास विजपुरवठा खंडीत झाला होता.

ठळक मुद्दे वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वीजेच्या तारा व पोल पडल्या

चांदवड : चांदवड तालुका व शहरात काल रविवारी सुमारे दोन तास जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर या वादळी वाºयामुळे झालेल्या पावसाने वीज व्यवस्था पुर्णपणे कोलमडली तर सुमारे १२ तास विजपुरवठा खंडीत झाला होता. रात्रभर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी मधुसूदन वाढे, उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज अधिकारी व कर्मचाºयांनी सदरचा वीज पुरवठा सुरळीत प्रयत्न केला.चांदवड तालुक्यात वादळी वाºयासह जोराचा पाऊस यामुळे वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला त्यात १३२ केव्ही. रानवड उपकेंद्रातून निघालेले ३३ केव्ही फिडर एकुण सहा ब्रेकडाऊन अवस्थेत झाले. बहुतांश तालुका अंधारात गेला. घरगुती ,वाणिज्य, औद्योगिक तसेच शेतीपंप बहुतांश ग्राहकांना १२ तासांपासून विद्युत पुरवठा मिळाला नाही.वरिष्ठ अधिकारी व कर्मचाºयासह सर्वजण लाईनवर हजर झाले व संपूर्ण रात्रभर व सोमवारी पूर्ण दिवसभर काम करून जागून लाईट पूर्वावस्थेत करण्यासाठी प्रयत्न चालू होते.विजांच्या कडकडाटामुळे बहुतांशी ठिकाणी डिस्क पंक्चर झाले, पीन इन्सुलेटर पंक्चर झाले, तसेच बहुतांश ठिकाणी कंडक्टर तुटून पडले.११ के व्ही.पोल, एल टि पोल तुटून पडले, तारा तुटल्या .तर चांदवड तालुक्यातील बहुतांश उपकेंद्रामध्ये लाईट नव्हती.अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन सप्लाय पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण ठिकाणचा सप्लाय पूर्ववत झाला. चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी झालेले लाइन फॉल्ट काढण्यासाठी मटेरियल पोचविण्यासाठी जाणारी गाडीची व्यवस्था तात्काळ करण्यात आल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

रविवारी झालेल्या वादळी वाºयामुळे व प्रचंड अशा विजांच्या कडकडाटामुळे महावितरण कंपनीच्या लाईनचे खूप नुकसान झालेले आहे. ३३ के व्ही, ११ के व्ही. लाइनचे कंडक्टर व पोल भरपूर ठिकाणी तुटून पडल्याचे आढळून आल्यावर सर्व कर्मचाºयांनी दिवसरात्र मेहनत घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. गेल्या २४ तासांपासून सर्व अभियंते व वीज तंत्रज्ञ हे लाईनवर काम करून विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते.अंधारात विविध ठिकाणी झालेले लाइन फॉल्ट काढण्यासाठी मटेरियल पोहचविण्यासाठी जाणारी गाडीची व्यवस्था तात्काळ करण्यात आली. तर उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांना प्रचंड ताप १०२ असूनही ते देखील सर्व गोष्टी बाजूला ठेवून लाईन चालू करण्यासाठी तात्काळ हजर झाले तर चांदवड शहरात देखील बहुतांश ठिकाणी पोल पडलेले असल्याने बहुतांश भाग अंधारात होता.- मधुसूदन वाडे, कार्यकारी अभियंता,