शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

ढगाळ हवामानासह बरसल्या हलक्या सरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:24 IST

शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ठळक मुद्देवातावरणात गारवा : शहरासह उपनगरांमध्ये अधूनमधून वर्षाव

नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर वाºयाचा वेग वाढला असून, दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पाऊस या पुढील दोन दिवसांत जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातदेखील वाºयाचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सूर्यप्रकाश गायब राहिला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाने काही भागांत हजेरी लावली. मात्र, पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ पहावयास मिळाला.शहरात पहाटे १.२ मिलीमीटर, तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.६ मिलीमीटर पाऊस पेठरोडवरील हवामान निरीक्षक केंद्राकडून नोंदविला गेला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह वडाळा, इंदिरानगर, जुनेनाशिक, द्वारका, उपनगर, आंबेडकरनगर या भागात दमदार सरींचा वर्षाव झाला मात्र वारा सुुटल्यामुळे सरी अल्पवेळच टिकू शकल्या. रविवारची सुटी आणि संध्याकाळनंतर संचारबंदी व जमावबंदी आदेशाची केली जाणारी काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळे रस्त्यांवर फारशी वर्दळ पहावयास मिळाली नाही.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस