शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

नाशकात पुन्हा ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 19:07 IST

नाशिक : सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवनागी देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिघात पुन्हा एकदा मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ चा आवाज घुमणार असल्याने निदान चित्रपट, मालिका कलाकार आणि त्यासाठी तांत्रिक कामे करणाऱ्या तंत्रज्ञांना तरी काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

नाशिक : सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवनागी देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिघात पुन्हा एकदा मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ चा आवाज घुमणार असल्याने निदान चित्रपट, मालिका कलाकार आणि त्यासाठी तांत्रिक कामे करणाऱ्या तंत्रज्ञांना तरी काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून अर्थचक्राला चालना देण्यासह चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना त्यातून अर्थाजर्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहे.नाशिक जिल्हा हा मुंबई व पुणे यांच्या लगतचा जिल्हा असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तसेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीकरणास चित्रपट आणि मालिका निर्मात्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यातील चित्रीकरण बंद झाले. त्यामुळे निर्मात्यांनी गुंतवलेला पैसा अडकल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. तसेच कलाकार, तंत्रज्ञांनाही काम नसल्याने त्यांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली होती. गुंतलेला पैसा परत मिळवायचा असेल, तर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण ताबडतोब करणे गरजेचे बनले होते. त्यात नाशिकला पालकमंत्र्यांनी परवानगी दिल्याने या क्षेत्राला थोडाफार तरी दिलासा मिळू शकणार आहे. चित्रीकरणादरम्यान संबंधितांना सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळावे लागणार आहे. त्यासाठी गतवर्षी आखून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकShootingगोळीबार