नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना श्रमिकनगरमधील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू पाटील (६३, रा़ सिद्धिविनायक सोसायटी, श्रमिकनगर, सातपूर) हे ५ व ६ सप्टेंबर रोजी बाहेर गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून १७़०५ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक एलसीडी असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
घरफोडीत सोने-चांदीचे दागिने लंपास
By admin | Updated: September 11, 2016 01:46 IST