शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:20 IST

येथील जुन्या आखाड्यानजीक मंदिरात अन्नपूर्णामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लक्षचंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वतयारीच्या नियोजनासाठी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्र्यंबकेश्वर : येथील जुन्या आखाड्यानजीक मंदिरात अन्नपूर्णामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लक्षचंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वतयारीच्या नियोजनासाठी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  बैठकीत लक्षचंडी यज्ञ सोहळ्याच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विविध समित्या करण्यात येऊन जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. २००० मध्ये सहस्त्रचंडी महायज्ञाने भूमिपूजन करून मंदिरनिर्मितीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ फेब्रुवारीपासून ११ दिवस लक्ष चंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नांदीश्रद्धा , सोळा संस्कार, होम-हवन आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. लक्षचंडी यज्ञासाठी १०० यज्ञ कुंडं तयार करण्यात येणार असून, ६५० ब्राह्मणांच्या व १०० यजमानांच्या सहभागाने पाठात्मक हवन केले जाणार आहे. महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांनी १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अन्नपूर्णामातेचे मंदिर असावे असा संकल्प केला होता. त्या संकल्पाची फेबु्रवारी महिन्यात पूर्ती होत आहे. याप्रसंगी महंत दिव्यानंद, महंत विवेकानंद, श्यामकुमार सिंगल, सुरेश रावत, विलास ठाकूर, किशोर गोयल, शेखर सावंत, दिलीप काळे, सतीश दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.अनोखे मंदिर, भिंतींवर पौराणिक देखावे मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरनंतर त्र्यंबकेश्वर येथे तयार झालेले हे मंदिर म्हणजे बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. राजस्थानहून मागविलेल्या संगमरवरी पाषाणातून हे मंदिर तयार करण्यात आले आहे. मंदिरात स्थापन करण्यात येणारी अन्नपूर्णामातेची मूर्ती १९३१ किलो वजनाची आहे. ही मूर्ती पंचधातूपासून बनवली आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक देखावे चितारलेले आहेत.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर