लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अनैतिक संबंधाचा संशय घेत इगतपुरीतील नवा बाजार भागात आरोपी सायना ऊर्फ शहाजान सगीर शेख (४०, रा. पटेल चौक, इगतपुरी) याने सगीर इस्माईल शेख (५४) याच्या घरी जाऊन तो झोपलेला असताना कोयत्याने वार करून जागीच ठार मारल्याची घटना १२ जानेवारी २०१७ रोजी घडली होती. या गुन्ह्णात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पांडे यांनी आरोपी शहाजान यास दोषी धरून खुनाच्या गुन्ह्णात जन्मठेप व दोन हजारांचा दंड अशी शिक्षा सोमवारी (दि.२) ठोठावली.इगतपुरीतील नवा बाजार भागात तीन वर्षांपूर्वी आरोपी शहाजान याने रात्रीच्या सुमारास जेवणानंतर बाहेर फेरफटका मारताना सगीरचे घर गाठले होते. यावेळी त्याच्यावर त्याने अनैतिक संबंधाचा संशयदेखील घेतला होता. त्याने सगीरच्या बहिणीला मोतिबिंदू शस्त्रक्रियेच्या खर्चापोटी जाब विचारून कुरापत काढली. या कुरापतीवरून सगीर व शहाजान यांच्यात वाद झाले. यावेळी त्याने मनात राग धरून घरातील टीव्हीचा आवाज मोठा करून जुन्या लोखंडी कोयत्याने सगीरवर हल्ला चढविला. त्याच्या डोके व मानेवर गंभीर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर शहाजान याने गुन्ह्णात वापरलेला रक्ताने माखलेला कोयता त्याच्याच घरात नळाखाली धुवून घेत बाराबंगला परिसरात करंजीच्या झाडीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.सोमवारी झाली अंतिम सुनावणीघटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत सगीरच्या मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी पाठविला. तपासी अधिकारी तत्कालीन सहायक निरीक्षक मांडवे यांनी या खुनाच्या गुन्ह्णाचा सखोल तपास करत परिस्थितीजन्य पुरावे, गुन्ह्णातील शस्त्र जमा करून १० मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यावर अंतिम सुनावणी सोमवारी झाली. यावेळी सरकारी वकील कापसे यांनी बाजू मांडली.
खूनप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:17 IST
नाशिक : अनैतिक संबंधाचा संशय घेत इगतपुरीतील नवा बाजार भागात आरोपी सायना ऊर्फ शहाजान सगीर शेख (४०, रा. पटेल चौक, इगतपुरी) याने सगीर इस्माईल शेख (५४) याच्या घरी जाऊन तो झोपलेला असताना कोयत्याने वार करून जागीच ठार मारल्याची घटना १२ जानेवारी २०१७ रोजी घडली होती.
खूनप्रकरणी जन्मठेप
ठळक मुद्देजिल्हा न्यायालय : तीन वर्षांपूर्वी इगतपुरीत घडला होता गुन्हा