शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या खुनातील दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:02 IST

हॉटेल व्यावसायिकास रामवाडी पुलाजवळ अडवून लूट केल्यानंतर निर्र्घृण खून करणाऱ्या विक्की ऊर्फ वैभव दत्तात्रय काळे (२१, रा़ तळेनगर, रामवाडी, पंचवटी) व बॅटºया ऊर्फ कृष्णा सदानंद चांदवडकर (१९, रा़ फ्लॅट नंबर १६, शिवदर्शन अपार्टमेंट, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) या दोघांन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शनिवारी (दि़२२) जन्मठेप व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ अरूण बर्वे (स्नेहपार्क सोसायटी, बच्छाव हॉस्पिटलमागे, पंचवटी) या हॉटेल व्यावसायिकाचा आरोपींनी लूट करून खून केल्याची घटना घडली होती़

नाशिक : हॉटेल व्यावसायिकास रामवाडी पुलाजवळ अडवून लूट केल्यानंतर निर्र्घृण खून करणाऱ्या विक्की ऊर्फ वैभव दत्तात्रय काळे (२१, रा़ तळेनगर, रामवाडी, पंचवटी) व बॅटºया ऊर्फ कृष्णा सदानंद चांदवडकर (१९, रा़ फ्लॅट नंबर १६, शिवदर्शन अपार्टमेंट, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) या दोघांन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शनिवारी (दि़२२) जन्मठेप व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ अरूण बर्वे (स्नेहपार्क सोसायटी, बच्छाव हॉस्पिटलमागे, पंचवटी) या हॉटेल व्यावसायिकाचा आरोपींनी लूट करून खून केल्याची घटना घडली होती़  ३१ मे २०१७ रोजी हॉटेलचे कामकाज आटोपून अरुण बर्वे हे रात्रीच्या सुमारास आपल्या मेस्ट्रो दुचाकीने घरी परतत होते़ आरोपी काळे व चांदवडकर यांनी रामवाडी पुलाजवळ बर्वे यांची दुचाकी अडवून त्यांच्या हातातील चांदीच्या अंगठ्या, गळ्यातील चांदीची चेन, कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेत दगडाने डोक्यावर मारहाण तसेच कोयत्याने पाठीवर वार करून खून केला़ यानंतर त्याचे प्रेत गोदावरी नदीत फेकून देऊन मेस्ट्रो दुचाकी घेऊन गेले होते़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़पंचवटी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंढे या घटनेचा तपास करीत असताना एका खबºयाकडून आरोपींकडे नवीन मेस्ट्रो दुचाकी असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार या काळे व चांदवडकर यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीच्या कालावधीत सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत, गुन्ह्यात वापरलेले हत्यार कोयता, चोरलेले दागिने व मेस्ट्रो दुचाकी व रक्ताने भरलेले कपडे काढून दिले होते़ या गुन्ह्याचा तपास करून मुंढे यांनी न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील आऱ एल़ निकम यांनी न्यायालयात दहा साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़शिक्षेसाठी पैरवी अधिकारी एएसआय पी़ व्ही. शिंदे, पोलीस नाईक एस़ एल़ जगताप, पोलीस शिपाई आऱ आऱ जाधव यांनी प्रयत्न केले़न्यायाधीश गिमेकर यांनी या खून खटल्यात शिक्षा देताना पोलिसांनी गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे, आरोपीकडून मयत बर्वे यांच्या जप्त केलेल्या वस्तू, दुचाकी तसेच साक्षीदारांची साक्ष या बाबी लक्षात घेऊन दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी